अनिल बोरगेवर फौजदारी गुन्हे दाखल करा ः भांबरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 1, 2021

अनिल बोरगेवर फौजदारी गुन्हे दाखल करा ः भांबरकर

 बनावट डिग्रीद्वारे “आरोग्य अधिकारी”पद मिळविले

अनिल बोरगेवर फौजदारी गुन्हे दाखल करा ः भांबरकर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरपालिकेचे रूपांतर 2003 मध्ये महापालिकेत होत असताना ‘आरोग्य अधिकारी’ या पदावरील निकषात तत्कालीन रक्तपेढी मेडिकल ऑफिसर डॉ अनिल बोरगे हे बसत नसताना त्यांना या पदावर बनावट डिग्रीच्या आधारे नियमबाह्य बसविण्यात आले बोरगे यांना साथी रोग नियंत्रण करण्याचा कोणताही अनुभव नसल्यामुळे कोरोना काळात त्यांना या पदावरून हटवून त्यांचे वर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निर्भय नवजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मी डॉ. अनिल बोरगे यांचे आरोग्य अधिकारी पदावर नियमबाह्य नेमणूक असल्याने दि 31.7.2020 रोजी मा. राज्यपाल यांचेकडे त्यांचेवर कार्यवाही करण्यासाठी अर्ज दिला असता या अर्जावर असणारा सविस्तर अहवालाची प्रत अहमदनगर मनपा आयुक्त यांनी नगरविकास खात्यातील सचिव यांना पाठविली व त्याची एक प्रत मला देखील देण्यात आली आहे. हा अहवाल हा खुद्द मा.आयुक्त यांनी सही करून दिलेला असून त्यामध्ये डॉ. अनिल बोरगे हे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी पात्र नसल्याचे सर्व सोहळा (16) मुद्दे दिले आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की, डॉ. अनिल बोरगे यांनी मनपाची पदव्युत्तर शिक्षणासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहून दोन वर्षांची पदविका (डिग्री) ही फक्त एका वर्षामध्ये आणल्याचे लिहून दिले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, त्यांची डिग्री ही बनावट आहे.
   डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे साथीचे रोग नियंत्रण करण्याचा कोणताही अनुभव नसून कोविडच्या ह्या महामारी मध्ये जे रुग्ण वाढ होत आहे, त्याला ते पूर्ण कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावरून हटविण्यात यावे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी या पदाचा जो काही पगार घेतला आहे, तो तात्काळ वसूल करून मनपाचे खात्यात जमा करावी असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here