फी न भरल्यास परीक्षा न घेण्याची धमकी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

फी न भरल्यास परीक्षा न घेण्याची धमकी..

 फी न भरल्यास परीक्षा न घेण्याची धमकी..

सेठ नंदलाल धुत शाळा प्रशासनावर कार्यवाही करा ः मनसे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः “रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन” च्या सेठ नंदलाल धूत शाळेतील शिक्षक वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षेच्या नावाखाली फी भरण्यास सक्ती करीत असून फी न भरल्यास परीक्षा न घेण्याची धमकी देत असून अशा शाळांवर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी मनसे सचिव नितीन भुतारे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात भुतारे यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी वाढतच चालली आहे. आता 2020-2021 हे शैक्षणिक वर्ष संपत आले असुन कोरोणाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे अहमदनगर जिल्हयातील व शहरातली शाळा बंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आसुन शासनाने पहिली  ते आठवी पर्यंत चे सर्व विद्यार्थी पुढच्या वर्गात वर्षात पाठवण्याचे जाहीर केले असताना देखिल काही शाळा फी च्या नावाखाली वार्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा च्या नावाखाली फी भरण्यास सक्ती करत असुन फी भरली नाही तर वार्षिक परीक्षा तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची घेणार नाही अशी धमकी रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन च्या सेठ नंदलाल धुत शाळेतुन शिक्षक पालकांना फोन करुण देत आहे.
    जो पर्यंत शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा ईतर फी रद्द करून फक्त शिकवणी फी घेत नाहि तो पर्यंत कोणीही शाळांची फी भरणार नाहि असे आवाहन मनसेने मागेच केले होते. या मागणीवर मनसे पालकांच्या बाजूने आजही ठाम आहे. तसेच शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी यांना निवेदन सुद्दा दिले परंतु शासनाने या वर परिपत्रक काढून पालकांना दिलासा दिला परंतु कुठलीही खाजागी इंग्रजी माध्यमांच्या शाळा या परिपत्रकाला जुमानत नसुन अश्या प्रकारच्या धमकी देण्याचे काम पालकांना करत असुन आपण या व अश्य धमक्या देणार्‍या शाळेंवर कारवाई करावी व यांची मुजोरी थांबवावी असे निवेदन मनसेचे नितीन भुतारे यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.आपण जर या अश्या शाळांवर ताबडतोप कारवाई केली नाही तर अश्या रामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन च्या सेठ नंदलाल धूत स्कूल शाा सारख्याकााां धमकी देणार्‍या शाळेना मनसे स्टाईल धडा शिकवू असा ईशारा मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे यावर शिक्षणाधि कारी  दोन दिवसात जिल्हयातील व शहरातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची ऑनलाईन मीटिंग घेऊन या प्रश्नावर मार्ग काढू असे आश्वासन मनसेला शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment