पोलिस पत्रकार, आरोग्य विभागास कोरोना किट, उद्योजक विजय हरिहर यांचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

पोलिस पत्रकार, आरोग्य विभागास कोरोना किट, उद्योजक विजय हरिहर यांचा उपक्रम

 पोलिस पत्रकार, आरोग्य विभागास कोरोना किट, उद्योजक विजय हरिहर यांचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यातील    मढेवडगाव येथील रहिवासी तर सध्या पुणे येथील उद्योजक  व्यावसायिक विजय हरिहर यांनी तालुक्यातील श्रीगोंदा पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पत्रकार संघटना,    आरोग्य सेवक सेविका ग्रामपंचायतचे सेवक यांना  कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी  आपण आपली काळजी घेण्यासाठी समाज हिताचे काम करणार्‍या व्यक्तीना   मास्क ,सनिटायझर, हॅन्ड ग्लोज, असे किट श्रीगोंदा येथे पोलीस अधिकारी,  कर्मचारी व कोविड सेंटर मधील आरोग्य सेवक सेविका यांनाही आपल्या  वाढदिवसा  निमित्त सर्व वस्तुचे वाटप केले आहे.  त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,  तालुका आरोग्य अधिकारी  डा.नितिन खामकर, पोलिस निरिक्षक रामराव ढिकले,  मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच  महानंदा फुलसिंग मांडे उपसरपंच गणेश मांडे ग्रामपंचायत सदस्य दिपक गाडे दक्ष फाउंडेशनचे दत्ताजी जगताप आदी उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment