कोरोनाला हरवायचे तर प्रत्येकाने स्वत: काळजी घ्यावी : मनोज छाजेड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

कोरोनाला हरवायचे तर प्रत्येकाने स्वत: काळजी घ्यावी : मनोज छाजेड

 कोरोनाला हरवायचे तर प्रत्येकाने स्वत: काळजी घ्यावी : मनोज छाजेड

कोविड रूग्णांसाठी जितोच्यावतीने तिसरे सुपर स्पेशालिटी कोविड सेंटर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पुणे ः  पुणे शहर व जिल्ह्यात करोना रूग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. ही बाब लक्षात घेवून जितो पुणेच्यावतीने डेक्कन भागातील हॉटेल अम्बेसिडर येथे सुपर स्पेशालिटी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन आ.माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, पुणे शहर अध्यक्ष ओमप्रकाश रांका, चीफ सेक्रेटरी पंकज कर्नावट, ऍड.अभय छाजेड, सिध्दी ग्रुपचे मनोज छाजेड, इंदर जैन, इंदर छाजेड आदी उपस्थित होते.
आ.माधुरी मिसाळ म्हणाल्या की, जैन संघटनेचे पदाधिकारी नेहमी संकटकाळात मदतीची भूमिका घेतात. पैसा, बुध्दी याचा वापर लोककल्याणासाठी केला तर तो सार्थकी लागतो. सध्या करोनाची दुसरी लाट महाभयानक असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. अशा परिस्थितीत जितोच्यावतीने सुरु करण्यात आलेले तिसरे अद्ययावत कोविड सेंटर रूग्णांसाठी वरदान ठरेल.
मनोज छाजेड म्हणाले की, सध्याच्या काळात करोनाला हरवायचे असेल तर प्रत्येकाने स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. जितोने पुण्यात दोन अद्ययावत कोविड सेंटर सुरु केले आहेत. याठिकाणी व्हेंटीलेटरची सुविधाही दिली आहे. मात्र वाढत्या रूग्णसंख्येमुळे ही दोन कोविड सेंटरही पूर्ण भरल्याने आता तिसरे सुपरस्पेशालिटी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी 55 बेडची सुविधा देण्यात आली आहे.
ओमप्रकाश रांका म्हणाले की, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून जितोच्यावतीने तिसरे कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आलेला प्रत्येक रूग्ण हा परिवारातील सदस्य असल्याप्रमाणे त्याला आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हॉटेलचे मालक सतीश हेरेकर यांनी मानवतेच्या भावनेतून कोविड सेंटरसाठी जागा दिली आहे.
या कार्यक्रमाला जितो सेके्रटरी चेतन भंडारी, अशोक हिंगड, अजित सेटिया,रमेश गांधी, सुनील नहार, विलास राठोड, डॉ.हेमंत धोका, डॉ.केविन बोरा, लखीचंद खिंवसरा, आदेश खिंवसरा, हितेश शहा, संदीप लुणावत, सतीश हेरेकर, चेतन जैन, योगेश बाफना, अमित लोढा, गणेश कर्नावट, वैभव शहा, पराग दोशी, जयेश जैन, हर्षल ओसवाल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment