सरकार व पालकमंत्री यांचेकडे ऑक्सीजनची मागणी करणार - महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, April 17, 2021

सरकार व पालकमंत्री यांचेकडे ऑक्सीजनची मागणी करणार - महापौर वाकळे

 सरकार व पालकमंत्री यांचेकडे ऑक्सीजनची मागणी करणार - महापौर वाकळे

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतला शहरातील डॉक्टर्स व सामाजिक संस्थाचा ऑन लाईन आढावा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रूग्णांबरोबरच नातेवाईकांमध्ये असलेले समज गैरसमज या संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांनी आज शहरातील डॉक्टरांची व सामाजिक संस्थांची ऑनलाईन बैठक घेवून विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे यांनी सांगितले की डॉक्टर रात्रंदिवस कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी काम करित आहेत. मात्र ऑक्सिजनचा तुतवडा मोठया प्रमाणात जाणवत असल्यामुळे रूग्णांचे प्राण जावू शकतात याची जबाबदारी प्रशासनाची राहील आजच आम्ही जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. डॉक्टरांना एकएक सिलेंडरसाठी लढाई करावी लागत आहे. पुढील 10 दिवसाचे नियोजन केले नाही तर भयानक परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर म्हणून आम्ही सेवा देतो. डॉक्टरांना शस्त्रच दिले नाही तर आम्ही किती दिवस लढणार. ऑक्सीजनचे टॅकर नगर शहरात आल्या नंतर जिल्हा रूग्णालयात पोलिस बंदोबस्त मध्ये जातात.खाजगी हॉस्पीटलला मोठया प्रमाणात रूग्ण दाखल झालेले आहेत. त्यांनाही ऑक्सीजनची गरज असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ऑक्सीजनचा पुरवठा मोठया प्रमाणात करावा.
डॉ.गोपाळ बहुरूपी बैठकीत म्हणाले की, रूग्णांमध्ये व नातेवाईकांमध्ये रेमडेसिवीर संदर्भात उडालेला गोंधळ नक्कीच त्रास दायक आहे. रूग्णांना रेमडेसिवीर दयावे असे काही नाही. रेमडेसिवीर दिले नाही म्हणजे पेशंट दगावत नाही. व मृत्यू दरही कमी होत नाही. सर्वात महत्वाचे सध्या कोरोना रूग्णांना ऑक्सीजनची गरज महत्वाची आहे यासाठी प्रशासनाने ऑक्सीजनचा साठा उपलब्ध करून दयावा याच बरोबर मनपाने कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब त्या पेशंटला अंत्यविधीसाठी घेवून जाणे गरजेचे आहे. कारण त्याजागी दुसर्‍या पेशंटला उपचार देता येईल. यावेळी डॉ.शेख निसार म्हणाले की, कोरोना रूग्णांचे मिळणारे रिपोर्ट उशिरा मिळतात सरकार आधी त्यांच्या पोर्टलवर रिपोर्ट टाकले जातात मग रूग्णांला दिले जातात तो पर्यत ती व्यक्ती अनेक जणांच्या संपर्कात येते. आजच नागपूर हायकोर्टाने ताबडतोब रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर टाकण्याचे पारित केले आहे. यावेळी डॉ.मुंकुद तांदळे, डॉ.विद्याधर त्रिंबके, डॉ.एस.बी.जोशी  डॉ.सिमरण वधवा,  डॉ. प्रशांत पटारे, डॉ.शेंडगे, डॉ.नितीन नारंग, डॉ.सुनिल कटारिया, डॉ.संतोष गांगर्डे डॉ.संदिप धुमाळ, डॉ.नितीन नागरगोजे, डॉ.संतोष राठोड, डॉ. निखील डॉ.रेगे, होमीपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.फंदे आदींनी चर्चेत भाग घेवून विविध मुद्दे उपस्थित केले.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.बोरगे यांनी डॉक्टरांच्या विविध प्रश्नांला उत्तर देताना म्हणाले की, आजच राज्य सरकारने नियमावली जाहिर केली असून 1) पेशंट जर व्हेटीलेटर वर नसेल तर ऑक्सीजन 95 टक्के वर जावू देवू नका, 2) व्हेटीलेटरवर पेशंट असला तर ऑक्सीजन 88 ते 92 टक्के दयावा. 3) ऑक्सीजन कॉन्संट्रेट्रर चा वापर करणे. 4) हाय फ्लो ऑक्सीजनचा वापर टाळावा. 5) घरी रूग्णांना ऑक्सीजन सिलेंडर देवू नये या उपाय योजना केल्यास ऑक्सीजनची बचत होण्यास मदत होईल. याच बरोबर गरज नसेल त्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन प्रिसक्रीप्शन देवू नये. रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पहिल्या 9 दिवसामध्ये असते त्यामध्ये दिल्यावरच त्याचे इंन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. त्यानंतर या इंजेक्शनचा कोरोना रूग्णांना उपयोग होत नाही.
यावेळी महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांनी बैठकीमध्ये सर्व डॉक्टरांना आवाहन केले की, आपण सर्वांनी मिळून या कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे. सर्व रूग्णांवर उपचार करावे. उपचाराविना कोणताही रूग्ण वंचित राहणार नाही याची सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी व मनपा प्रशासनाने दक्षता यावी. यावेळी बैठकीमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा मोठयाप्रमाणात जाणवत असल्याचे निदर्शनास आल्यास उदया मा.पालकमंत्री महोदय यांना नगर शहरामध्ये  मनपाच्या जागेमध्ये ऑक्सीजनचा प्लॅट उभारण्यासाठी परवानगी आणि निधी मागण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मा.ना.श्री.हर्षवर्धन यांच्याकडेही ऑक्सीजन प्लॅट उभारण्यासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. यावेळी आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे म्हणाले की, ऑक्सीजन प्लॅटची देखभाल आम्ही करून यावेळी विविध सामाजिक संस्थाचे मते जाणून घेतली. यावेळी बैठकीस सभागृह नेते रविंद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ.अनिल बोरगे, राजेश लयचेट्टी, श्री.पुष्कर कुलकर्णी व डॉक्टर्स व शहरातील सामाजिक संस्थचे श्री.क्षितीज झावरे, संदिप कुसळकर, अविनाश साखला, मुन्शी सर, प्रविण मुत्याल, गिरीष कुलकर्णी, प्रकाश लोळके, हरजिंतसिंग वधवा, ईश्वर बोरा, अजित कुलकर्णी, श्री.विजय गुगळे, श्री.राजेंद्र गांधी, अजय गांधी, संदिप गुगळे, श्रीमती गिता गिल्डा, भोयर, अमित सोनग्रा पदाधिकारी आदी उपस्थित होते. सामाजिक संस्थांच्या वतीने प्रभाग वाईज लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली, कोरोना रूग्णांचे नातेवाईक कोवीड सेंटरला येतात त्यांनी नियमाचे पालन करावे. शहरामध्ये छुप्या पध्दतीने व्यवसाय सुरू आहे तो बंद करावा. नागरिकांनी गर्दी न करता शासनाचे नियमाचे पालन करावे. काम असल्यासच घराबाहेर पडावे, विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरिकांना दंड आकारून त्यांना एक दिवस सेवा करण्याची शिक्षा दयावी. मनपाच्या वतीने सामाजिक संस्थाना अन्टीजन किटस उपलब्ध करून दिल्यास आम्ही ते काम करण्यास तयार आहोत. रस्त्यावर गर्दी होत आहे याबाबत प्रशासन गस्त घालीत नाहीत.त्यामुळे नागरिकांवर वचक राहिलेला नाही अशा सुचना सामाजिक संस्थांनी केल्या यावर बोलताना महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सामाजिक संस्थाने मांडलेल्या सुचनांचा विचार करून आमलात आणू.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here