कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना पीपीई किटची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना पीपीई किटची मदत

 कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार करणार्‍या कर्मचार्‍यांना पीपीई किटची मदत

कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी ‘रोटरी’चा अतिशय संवेदनशील उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत असून नगरच्या अमरधाममध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. यात नगर शहराबरोबरच जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील करोना मयतांवरही शासन निर्देशानुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम येथील कर्मचारी करीत आहेत. या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी रोटरी क्लबच्या सर्व पाच शाखांच्यावतीने 51 पीपीई किटसची मदत देण्यात आली आहे. अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुर्हे यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, रोटरी इंटीग्रिटीचे डॉ.रिजवान अहमद उपस्थित होते. या उपक्रमासाठी क्षितीज झावरे, रफीक मुन्शी, गिता गिल्डा, अमित बोरकर यांनी योगदान दिले.
प्रसन्न खाजगीवाले म्हणाले की, सध्याच्या अतिशय कठिण काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. दुर्देवाने करोनाबाधिताचा मृत्यु झाल्यास त्यांच्यावर शासकीय निर्देशानुसार अतिशय सुरक्षितपणे अंत्यसंस्कार करावे लागतात. अमरधाम येथे अशा मयतांवर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार करण्याचे काम अनेक कर्मचारी करीत आहेत. त्यांनाही सुरक्षेची तितकीच गरज आहे हे लक्षात घेवून सदर पीपीई किटची मदत देण्यात आली आहे.
ईश्वर बोरा यांनी सांगितले की, करोना मयतांवर शासकीय नियमानुसार पूर्ण पावित्र्य राखून अंत्यसंस्कार करण्याचे अतिशय पुण्याचे काम अमरधाम येथे करण्यात येत आहे. अतिशय धोकादायक परिस्थितीत हे काम करणार्या कर्मचार्यांच्या सुरक्षेचा विचार करून रोटरी सेंट्रल, रोटरी मिडटाऊन, रोटरी प्रियदर्शनी, रोटरी मेन व रोटरी इंटिग्रीटीच्यावतीने 51 पीपीई किट देण्यात आल्या आहेत. भविष्यात या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी आणखीही मदत करण्याचा रोटरीचा प्रयत्न राहिल.

No comments:

Post a Comment