हंगा येथे 293 नागरीकांचे लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

हंगा येथे 293 नागरीकांचे लसीकरण

 हंगा येथे 293 नागरीकांचे लसीकरण

चंद्रकांत मोढवे यांची माहिती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः आमदार नीलेश लंकेे यांचे गाव असलेल्या हंगा येथे 293 नागरीकांना कोव्हिशील्डची लस देण्यात आली. आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्याची माहीती चंद्रकांत मोढवे यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हंगा येथील उपक्रेंद्रामध्ये हे लसिकरण करण्यात आले. कोव्हीड 19 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला असून कोरोना बाधित रूग्णांवरील उपचार, त्यांना आवष्यक असलेले बेड तसेच  रेमडेसीवर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी ते आहोरात्र परिश्रम घेत आहेत. बुधवारी भाळवणी येथे आ. लंके यांच्या पुढाकारातून राज्यातील पहिल्या  लोकसहभागातील शरदचंद्र आरोग्य मंदीराचा शुभारंभ करण्यात आला असून तेथे कोरोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तब्बल 1 हजार सामान्य बेड तसेच 100 ऑक्सीजनची सुविधा असलेलेले बेड या मंदीरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून आ. लंके हे नागरीकांच्या मदतीसाठी आहोरात्र झटत असून त्यांच्या या कार्याची राज्य तसेच देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर आ. लंके यांनी आपल्या गावातील नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची व्यवस्था करून नागरीकाना या साथीपासून बचावासाठी पुढाकार घेतला आहे.
परिचारीका गोडसे यांनी नागरीकांना लसीकरण केले. आरोग्य उपकेंद्रातील सर्व कर्मचारी तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी यावेळी मोलाचे योगदान दिले. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब दळवी, जगदीश साठे, चंद्रकांत मोढवे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, राजेंद्र दळवी, सोपान दळवी, मनोहर दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment