ब्रेकिंग न्यूज वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांच्याकडून खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न . - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

ब्रेकिंग न्यूज वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांच्याकडून खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न .

 ब्रेकिंग न्यूज  

वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान यांच्याकडून खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न . नगरी दवंडी

वार्ताहर -नेवासा

 तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थिती याची आढावा बैठक नेवासा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात गुरुवारी झाली या आढावा बैठकीच्या प्रसंगी बहुजन वंचित आघाडीचे नेते व शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारी करणारे  संजय सुखदान यांची इन्ट्री झाली त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठक घ्यायला उशीर का लावल्या या बद्दल  जाब विचारला...रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी लोक मरतायेत ..ऑक्सिजन मिळत नाही तुम्ही करताय काय..असा सवाल करत शाही फेकण्याचा प्रयत्न प्रयत्न केला मात्र स्वीयसहायक सुखलाल गांगवे यांनी त्यांना अडविल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला.

     कोरोनाच्या संदर्भात नेवासा तालुक्यातील परिस्थिती बाबत प्रांताधिकारी गणेश पवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहसीन बागवान यांच्याशी खासदार लोखंडे यांनी चर्चा करत आढावा घेत असतांना वंचीत बहुजन आघाडीचे नेते व शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणारे उमेदवार संजय सुखदान यांची बैठकीच्या दालनात यावेळी इन्ट्री झाली कोरोनाची परिस्थिती भयावह असतांना आपण  उशीरा का आलात,तालुक्यात रेमडीसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजन अभावी लोक मरताहेत याबाबत तुम्ही करताय तरी काय असा सवाल केला यानंतर सुखदान यांनी लोखंडे यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला मात्र लोखंडे यांचे स्वीय सहायक गांगवे व सुखदान यांच्या झटापट झाल्याने हा प्रयत्न अयशस्वी झाला.

     त्यानंतर खासदार लोखंडे यांनी यात राजकारण करू नका असे सांगताच आम्ही जनतेसाठी लढतो वयक्तिक माझा काही स्वार्थ नाही जे चांगले काम करतात त्यांचे आम्ही कौतुक करतो तुमची भूमिका काय तालुक्यात लोक मरताहेत ..असे लोखंडे यांना सुनावले. तालुक्याच्या विषयी आपली भूमिका खासदार वाकचौरे यांनी स्पष्ट केल्यानंतर वातावरण शांत झाले मात्र सुखदान यांच्या आक्रमक पवित्र्याने व झालेल्या प्रकाराने सर्व अधिकारी ही अवाक झाले

No comments:

Post a Comment