कुकडी पाणी प्रश्नासाठी अनुराधा नागवडे यांनी घेतली जलसंपदामंत्र्याची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

कुकडी पाणी प्रश्नासाठी अनुराधा नागवडे यांनी घेतली जलसंपदामंत्र्याची भेट

 कुकडी पाणी प्रश्नासाठी अनुराधा नागवडे यांनी घेतली जलसंपदामंत्र्याची भेट


श्रीगोंदा -
डिंभे ते माणिकडोह बोगद्याला निधी देऊन त्याचे काम सुरू करावे तसेच बोगद्याचे काम सुरू होईपर्यंत फिडर कालव्याची दुरुस्ती करावी. कुकडीचे उन्हाळी रोटेशन 25 एप्रिलपर्यंत सोडावे अशी मागणी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या सोबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे बुधवारी (दि .14) पुणे येथे घेतलेल्या भेटीत केली आहे .
याबाबत अधिक माहिती देताना अनुराधा नागवडे यांनी सांगितले की कुकडीचे आवर्तन मे महिन्यात मिळाले तर लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना 25 एप्रिलपर्यंत पाणी मिळावे, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना उन्हाळ्यात पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामूळे प्रलंबित असलेल्या डिंभे ते माणिकडोह बोगद्याचे काम झाल्यास कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते त्यामूळे डिंभे ते माणिकडोह बोगद्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर फिडर कालव्याची दुरुस्ती झाल्यास पाण्याचा मोठा अपव्यय रोखणे शक्य होईल , त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीची देखील मागणी केल्याचे नागवडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment