आ. लंके यांनी दिलेल्या भावणीक सादेला मुंगशी करांनी दिला प्रतिसाद! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

आ. लंके यांनी दिलेल्या भावणीक सादेला मुंगशी करांनी दिला प्रतिसाद!

 आ. लंके यांनी दिलेल्या भावणीक सादेला मुंगशी करांनी दिला प्रतिसाद!

पाच टन धान्याचा टेंपो व रोख रक्कम 23, 333 रु आरोग्य मंदीरात जमा!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः “हे देवा माझ्या मायबाप जनतेला या आलेल्या संकटातून बाहेर काढ रे ....”
आ लोकनेते निलेशजी लंके यांनी परमेश्वराजवळ केलेल्या भावनिक  प्रार्थणेमुळे संकटातील बांधवांसाठी घरोघरी जात अन्नधान्य व रोख रक्कम जमा करत, मुंगशी ग्रामस्थांनी या अन्नकुंडात अल्पशी आहुती दिली.
“विश्वाच्या कल्याण संतांच्या विभूती !”
“देह कष्टविती परोपकारी !!”
या उक्तीप्रमाणे संपुर्ण विश्वासह पारनेर-नगर मतदार संघावर आलेल्या या कोरोनाचे सुलतानी संकट पाहता,अत्यंत हृदयद्रावक घटना रोज पहावयास व ऐकावयास मिळत आहे.तारुण्यात आपला कर्ता पुरुष, मायेचा आधार देणारा पालक किंवा तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारा एखादा मार्गदर्शक आज आपल्यातून निघून जात आहे.
आज कुठल्याही दवाखाण्यात बेड उपलब्ध नाही, कुणाला इंजेक्शन मिळत नाही या महामारीच्या जागतिक विषाणूचा सामना करण्यासाठी पारनेर तालुक्यातील एक योद्धा रस्त्यावर उतरतो.व मी आज असुरक्षित असलो तरी चालेल,परंतु माझी मायबाप जनता सुरक्षित राहिली पाहिजे या ध्येयाने झपाटले व विश्वाच्या कल्याण करण्यासाठी देव म्हणून कोरोना रुग्णांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो ते म्हणजे पारनेर नगर तालुका मतदार संघाचे राष्ट्रवादीचे लोकनेते निलेशजी लंके साहेब !
गेल्या वर्षापेक्षा यावर्षी या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याने 1000 बेड सर्वसाधरण व 100 ऑक्सिजन बेडचे अद्ययावत असे मोफत आरोग्य मंदिर उभे केले आहे परंतु ही मोठी जोखीम असल्याने या संकटातून अनेक गोरगरीब जनतेला बाहेर काढण्यासाठी मदतीची साथ आमदार साहेबांनी घालताच तालुका भरातून मदतीचा ओघ सुरु झाला !
त्यात मुंगशी या छोट्याशा गावातून सुदाम दळवी ,दिपक लंके,सरपंच अनिल कर्पे, सुदामराव थोरात, सतिष थोरात, विकास दगाबाज ही मंडळी पुढे येऊन या कोवीड सेंटरमध्ये धान्य व रोख रक्कम असे घरोघर जात जमा केले. आज इतक्या मोठ्या अन्नकुंडात अल्पशे योगदान आपणही द्यावे व या पुण्याच्या कामात सहभागी व्हावे हा विचार करत या तरुण मंडळींनी आपल्या गावातून घरोघरी जाऊन गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ एक टेम्पो भर पाच टन धान्य जमा केले. त्या सह पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम जमा केली. या सेवाभावी कार्यासाठी मुंगशी गावातील मुंबईस्थित असणार्‍या अनेक मान्यवर व्यवसायिक व नोकरदार मंडळींनीही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करून आमदार निलेश लंके यांच्या परोपकारी कार्यात सहभाग नोंदवीला...
या सामाजिक कार्यासाठी बाबुराव शिंगोटे, भास्कर थोरात, विश्वास शिंगोटे, सुनिल ना.थोरात यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अन्नधान्य जमा केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here