केंद्रावर आरोप करा..नी आपल पाप झाका! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

केंद्रावर आरोप करा..नी आपल पाप झाका!

 केंद्रावर आरोप करा..नी आपल पाप झाका!

राज्यातील मंत्र्यांना एकच काम


अहमदनगर :
राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा तुटवडा यांवरून राजकारण तापत चालल्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वार्‍यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात 200 बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी टीका केली.
नगर जिल्ह्यात 4 मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावत सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment