पाथर्डीमधील युवकाची औरंगाबादमध्ये हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

पाथर्डीमधील युवकाची औरंगाबादमध्ये हत्या.

 पाथर्डीमधील युवकाची औरंगाबादमध्ये हत्या.

मृतदेहाचा एक हात ही गायब, पोलिस चक्रावले.


अहमदनगर ः
जिल्ह्यातील पाथर्डी येथून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादला गेलेल्या विकास देविदास चव्हाण या 23 वर्षीय तरुणाची कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आज सकाळी 8 वाजता समोर आले. कोपर्‍यापासून एक हात गायब असल्याचे पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा तरुण चिकलठाणा भागातील आयऑन डिजिटल या केंद्रावर परीक्षा देणार होता. धक्कादायक म्हणजे त्याचा हात कोपर्‍यापासून तोडण्यात आला आहे. सकाळी लवकर परीक्षा असल्याने विकास हा रात्रीच शहरात आला असावा त्यामुळे लुटमारीतून विकासचा खून झाला का? किंवा त्याचा कुणाशी वाद होता का याबाबत सिटी चौक पोलीस शोध घेत आहे. विकासचा कोपर्‍यापासून हात तोडण्यात आला असून अजूनपर्यंत छाटून टाकलेला हात पोलिसांना मिळालेला नाही. घटनास्थळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह सिटी चौक तसेच गुन्हे शाखा पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.

No comments:

Post a Comment