‘बाळ’ ने कुठून जमविली ‘माया’? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

‘बाळ’ ने कुठून जमविली ‘माया’?

 ‘बाळ’ ने कुठून जमविली ‘माया’?

आयकर मुख्य आयुक्तांना अ‍ॅड. सुरेश लगड यांचे निवेदन.

पत्रकार बोठे झटपट श्रीमंत कसा झाला?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याने पत्रकारितेच्या माध्यमातून मोठी अवैद्य संपत्ती जमा कशी काय केली? बाळ ने ही माया कुठून जमविली? याबाबत आयकर विभागाने चौकशी करावी अशी मागणी अँड सुरेश लगड यांनी आयकर विभागाच्या मुख्य आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बोठे हा अनेक संस्थामध्ये स्लिपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पीटलमध्ये पार्टनर एल अ‍ॅण्ड टी क्लब सावेडी अहमदनगर जवळ 15 एकर क्षेत्र, भिस्तबाग, अहमदनगर जवळ 7 एकरचा मोठा प्लॉट व भिंगार येथे 5 एकराची जागा अशी एवढी ज्ञात संपत्ती असल्याचे समजले व या व्यतिरिक्त काही अज्ञात संपत्ती असेल त्याची संपूर्ण चौकशी आयकर खात्याने करणे आवश्यक आहे.
बाळ बोठे याचा पत्रकारीतेतील प्रवास, त्याला तेथे मिळत असलेले उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली संपत्ती, बेहिशोबी मालमत्ता याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करावी तसेच अनेक संस्थामध्ये तो छुपा भागीदार (स्लिपिंग पार्टनर) असल्याचे समजते. त्याबाबत त्याची चौकशी करण्याची करण्याची गरज आहे. अगदी सुरुवातीस प्रेस फोटोग्राफर म्हणून वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम केलेले होते.
तदनंतर बातमीदार म्हणून काम केलेले होते, त्यानंतर एका नामांकित वर्तमानत्रात सहाय्यक बातमीदार म्हणून, त्यानंतर मुख्य बातमीदार म्हणून, त्यानंतर निवासी संपादक व शेवटी कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले आहे. एक प्रेस फोटोग्राफर म्हणून सुरूवात केलेल्या या व्यक्तीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पत्रकारीता क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम केलेले आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा ’बाळ’ इतक्या झटपट इतका मोठा झाला कसा ? असा सवाल व्यक्त करीत बाळ बोठेची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती काय होती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे ? याची सखोल चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील. त्याचे उत्पन्न व त्याच्याकडे असलेली ज्ञात, अज्ञात, जंगम मिळकत, कॅश रक्कम याची बारकाईने चौकशी केली तर पत्रकारीता क्षेत्रातील ही व्यक्ती इतका झटपट श्रीमंत कशी होऊ शकते ? व त्यास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते की, एवढी प्रचंड माया गोळा करू शकला ? याचा उलगडा होईल. असे लगड यांनी निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment