कोरोना रुग्ण नातेवाईकांसाठी पार्सल मोफत भोजन सुविधा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

कोरोना रुग्ण नातेवाईकांसाठी पार्सल मोफत भोजन सुविधा.

 कोरोना रुग्ण नातेवाईकांसाठी पार्सल मोफत भोजन सुविधा.

आ. संग्राम जगतापांच्या संकल्पनेतून ‘टिम 57’ चा उपक्रम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्हयासह बीड जिल्हयातील व पैठण तालुक्यातील अतिसंवेदनशिल रूग्ण नगर शहरामध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत. संचारबंदी सुरू असल्यामुळे कोरोना रूग्णांची, नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था होत नसल्यामुळे अनेकांना उपाशी पोटीच रहावे लागते. सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक भावनेतून टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पार्सल स्वरूपात दोन वेळच्या जेवणाची मोफत पोहोच सेवा सुरू करण्यात आली आहे. साधू संताच्या शिकवणी नुसार संकट काळामध्ये एकमेकांना मदत करणे ही नगरकरांची प्रथा आहे. इतर संस्थांनाही पुढे येवून मदत कार्य सुरू करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मार्केट यार्ड, महात्मा फुले चौक येथे आ.श्री.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पार्सल स्वरूपात दोन वेळेसच्या जेवणाची मोफत पोहोच सेवेचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांचे हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी स्वप्निल पर्वते म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये बाहेरगांवाहून येणार्‍या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची व्यथा अत्यंत बिकट स्वरूपात पाहायला मिळत आहे. रूग्णांना बेड, औषधे , व्हेटीलेटर, ऑक्सीजन मिळण्या बरोबरच  जेवणाची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर लगेच आ.श्री.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टिम 57 फॅमिली पान पकवान यांच्या संकल्पनेतून कोरोना रूग्णांनाच्या नातेवाईकांना दोन वेळा जेवणाची व्यवस्था केली आहे. जे रूग्ण ज्या हॉस्पीटलला असतील त्या हॉस्पीटलमध्ये जावून नातेवाईकांना मोफत जेवण दिले जात आहे. नातेवाईकांनी सकाळी 9 ते  11 मोबाईल नंबर 7796883757, 7721033757 या क्रमांकावर नांव नोंदणी केल्यानंतर दुपारी 1 ते 2 व सायं. 7 ते  8 वाजेपर्यत जेवणाची मोफत पार्सल सुविधा दिली जाते. यामध्ये तीन चपाती, वरण भात, दोन भाज्या (सुकी /ओली) आदींचा समावेश आहे. यासाठी नातेवाईकांनी संपर्क करावा असेही ते म्हणाले. याप्रसंगी रामचंद्र पर्वते, स्वप्नील पर्वते, संतोष लांडे, छबुराव कांडेकर, राहुल बोरूडे, सचिन पर्वते, बंटी पोकळे, नानासाहेब साळवे, सोमनाथ खांदवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here