आरोग्य कर्मचार्‍यांनी कामाबाबत टोलवाटोलवी करू नये - आ. आजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

आरोग्य कर्मचार्‍यांनी कामाबाबत टोलवाटोलवी करू नये - आ. आजबे

 आरोग्य कर्मचार्‍यांनी कामाबाबत टोलवाटोलवी करू नये - आ. आजबे

आष्टी - आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर येथे बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली .यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, डॉ. शरद मोहरकर यांच्यासह सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.  कोविड रुग्ण आपणाकडे देवदूत म्हणून पाहत असल्याने आपणही देवदूत म्हणून काम करावे. आरोग्य कर्मचार्‍यांनी आपल्या कामाबाबत टोलवाटोलवी करू नये, आपणास लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देऊ. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.
आष्टी येथील ट्रामा केअर सेंटर येथे बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, डॉ. शरद मोहरकर यांच्यासह सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बाळाासाहेब आजबे यांनी सर्व कर्मचार्‍यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. तसेच त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचार्‍यांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here