यंदा नगर तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन ः नवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

यंदा नगर तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन ः नवले

 यंदा नगर तालुक्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन ः नवले

समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः यंदाच्या वर्षी नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात सुमारे 11 हजार 956 हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. यातून सुमारे 263 मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. मागील तीन वर्षाच्या गहू उत्पादनापेक्षा यावर्षी नगर तालुक्यात गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी दिली.
नगर तालुक्यात यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाला. त्यातच परतीच्या पावसाने वेळेवर उघडीप न दिल्याने रब्बीतील गव्हाची पेरणी लांबणीवर गेली. चांगल्या पावसाने पाण्याची पातळी
वाढल्याने बागायती क्षेत्रात गव्हाचे उत्पादन शेतकर्यांनी घेतले. शेतकर्‍यांनी  496 या वाणाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली असून, यापासून एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळू शकते. यातून तालुक्यात सरासरी प्रतिहेक्टरी 22 ते 24 क्विंटल म्हणजेच 263 मेट्रिक टन उत्पादन मिळू शकेल.

नगर तालुक्यात यावर्षी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. याचा शेतकर्‍यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. गव्हापासून त्यांना यावर्षी चांगले उत्पन्न मिळू शकेल. शेतकर्‍यांनी गहू व्यवस्थित ग्रेडिंग व पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी ठेवला, तर त्याला योग्य बाजारभाव मिळेल. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केल्यास ग्राहकांचा फायदा होईल. शिवाय शेतकर्यांची व्यापार्यांना द्यावी लागणारी दलाली वाचेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी थेट ग्राहकांना गव्हाची विक्री करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नवले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here