श्वास हॉस्पिटलच्यावतीने कोविड रुग्णांना शासकीय दरापेक्षा कमी दरात रुग्णसेवा देणार ः डॉ. काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 8, 2021

श्वास हॉस्पिटलच्यावतीने कोविड रुग्णांना शासकीय दरापेक्षा कमी दरात रुग्णसेवा देणार ः डॉ. काळे

 श्वास हॉस्पिटलच्यावतीने कोविड रुग्णांना शासकीय दरापेक्षा कमी दरात रुग्णसेवा देणार ः डॉ. काळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा फाटा ः नेवासाफाटा येथे श्वास हॉस्पिटलच्या वतीने मक्तापुर रोडवर असलेल्या जुन्या माऊली हॉस्पिटलच्या जागेत श्वास हॉस्पिटलच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून शासकीय दरापेक्षा कमी दरात कोविडच्या रुग्णांना सेवा देणार असल्याची माहिती हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देतांना श्वास हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे म्हणाले की, नव्यानेच नेवासा फाटा येथील मक्तापूर रोडवर जुन्या माऊली हॉस्पिटलच्या जागेवर आपण श्वास हॉस्पिटलच्या वतीने कोविड रुग्णालय सुरू केले असून सुमारे पन्नास बेडची सुविधा असलेल्या या कोविड हॉस्पिटलमध्ये तत्पर सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
इमर्जन्सी रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. सहा व्हेंटिलेटर, तर आयसीयूयुक्त 12 बेडची तसेच  ऑक्सिजनयुक्त 40 बेडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेवासाफाटा येथे कोविड रुग्णालयासाठी श्वास हॉस्पिटलने पुढाकार घेतल्याने नागरिकांची इतर ठिकाणी होणारी परवड दूर होणार असून नगर जिल्हयात ग्रामीण भागातील एकमेव सुसज्ज बेडयुक्त हे हॉस्पिटल असल्याचे डॉ.अविनाश काळे यांनी सांगितले.
मागील वर्षी नगरसह इतर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था नसल्याची समस्या उदभवल्याने नेवासा तालुक्याच्यातील भेंडा येथील नागेबाबा मंदिर स्ट्रस्टच्या भक्तीधाममध्ये आम्ही तालुक्यातील सुमारे 45 डॉक्टर मंडळींना एकत्रित करून लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधांनी युक्त असे कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. सुसज्ज आयसीयू व मुबलक ऑक्सिजनची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. जसजशी कोविड रुग्णांची संख्या घटली त्यानुसार हे कोविड सेंटर ही बंद करण्यात आले होते.
2021 पासून वर्षातील पहिला महिना संपत नाही तोच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने नेवासा तालुक्यासह इतर ठिकाणच्या रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व करण्यात आलेल्या मागणीनुसार नेवासाफाटा येथील श्वास हॉस्पिटलच्या वतीने कोविड रुग्णालय आपण सुरू केले असून सुसज्ज सुविधांसह शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दरापेक्षा कमी दरात कोविड रुग्णांना सेवा देऊन जीवदान देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे डॉ.अविनाश काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here