भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ते 2 हजार फूड पॅकेटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ते 2 हजार फूड पॅकेटचे वाटप

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ते 2 हजार फूड पॅकेटचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मंगल गेट येथील मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मंडळाच्यावतीने परिसरातील समाज बांधवांना प्रत्येकाच्या अन्नदान करण्यात आले. सुमारे 2 हजार फूड पॅकेट देण्यात आली .
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल क्षेत्रे,  महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सचिन जाधव यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.पगारे सर, योगेश भोकरे, अरुण बोराटे, शरद मुरवडकर,  विजय वागळे,  रियाज शेख, नईम शेख, रमेश सानप, मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष सुबोध ठोंबे, निपून भिंगरदिवे, अनिकेत शिंदे, आकाश सरोदे, गणेश कांबळे, सोनू मस्के, अनिकेत कांबळे, संजय साखरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व नगरांना शुभेच्छा देत यावेळी सुनील क्षेत्रे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी  समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले, असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here