जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांना जन्मजयंतीनिमित्त अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांना जन्मजयंतीनिमित्त अभिवादन

 जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांना जन्मजयंतीनिमित्त अभिवादन


अहमदनगर ः
सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा हे सर्वार्थाने आदर्श व्यक्तिमत्व होते. समाजभूषण असलेल्या भाऊंनी सामाजिक संस्था, आर्थिक संस्था चालवताना उत्कृष्ट व्यवस्थापनाच वस्तुपाठ घालून दिला. जय आनंद मंडळासाठी ते कायम प्रेरणास्रोत राहतील, अशा भावना जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेक्रेटरी हेमंत मुथा यांनी व्यक्त केल्या.
सहकारमहर्षी सुवालाल गुंदेचा यांच्या जन्मजयंतीनिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने मिटींग घेऊन गुंदेचा यांच्या स्मृतीस अभिवादन केले. जैन समाजासह सर्वच समाजातील दुर्बल घटकाप्रती त्यांना कळवळा होता. जैन वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. संस्थेचे हे कार्य आजही चालू आहे. सहकारी बँकींग, पतसंस्था चळवळीत त्यांचे अभ्यासपूर्ण योगदान राज्यात नावाजले जाते. जय आनंद मंडळाच्या वाटचालीत त्यांचे वेळोवेळी अनमोल असे मार्गदर्शन मिळायचे. या संस्थेची नवीन स्वमालकीची नवीन प्रशस्त इमारत उभी राहत आहे. ही सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे. अशा भावना व्यक्त करीत सर्वांनी गुंदेचा यांच्या आठवणींना उजाळा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here