पारनेर शहरामध्ये संचारबंदी नियम मोडणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

पारनेर शहरामध्ये संचारबंदी नियम मोडणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई!

 पारनेर शहरामध्ये संचारबंदी नियम मोडणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ब्रेक द चैन नुसार संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे त्यानुसार  तहसिलदार ज्योती देवरे पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर येथील चौकामध्ये कडक नाकेबंदी करून अनावश्यक बाहेर पडणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई सुरुवात केली आहे.
कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत संचारबंदी असताना नियमाचे पालन न करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून शहरातील चौकामध्ये नाकेबंदी करण्यात आलेले आहे. तसेच इतरही ठिकाणी नाकेबंदी करून प्रवास करणार्‍या वाहन धारकांची तसेच नागरिकांची तपासणी केली जात आहे शहरातील व्यापारी विक्रेते दुकानदार व्यवसायिकांना त्यांची  आर टी सी टी आर टेस्ट झाली नसेल तर असे दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच पारनेरमध्ये काही खासगी क्लास सुरू होते. विद्यार्थी रस्त्यावर फिरत असताना पथकाच्या ते लक्षात आल्यानंतर त्या पथकाने थेट खाजगी क्लासच्या ठिकाणी जाऊन धडक कारवाई केली. कॉलेज येथे कराटे क्लास येणार्‍या शिक्षकाला दहा हजार रुपये दंड तसेच प्रत्येक पालकाला एक हजार रुपये दंड अशी कारवाई करण्यात आली आहे. तालुक्यांमध्ये कोरोनासंदर्भातील कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत नागरिकांनी त्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जे नागरिक निर्बंधांना झुगारून अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी फिरत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment