सर्व धर्मीय साधुसंत समुदयाला लसीकरण करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, April 15, 2021

सर्व धर्मीय साधुसंत समुदयाला लसीकरण करण्याची मागणी

 सर्व धर्मीय साधुसंत समुदयाला लसीकरण करण्याची मागणी

अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्यात ठीक ठीकाणी वास्तव्यास असणार्‍या सर्व धर्मीय साधुसंतासह जैन धर्मीय साधु-साध्वी समुदयाला तातडीने कोविड लसीकरण करने तातडीचे आहे. यातिल अनेक अडचणीमुळे लसीकरणा पासुन सर्व धर्मीय साधुसंत वंचित राहतात.
महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकारी साहेबांना सर्व धर्मीय साधुसंतांना तातडीने कोविड लसीकरण करने बाबत लेखी आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या वतीने आरोग्य राज्य मंत्री ना.श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्र शाह यांनी एक सविस्तर निवेदन द्वारा केली.
अल्पसंख्यांक समितीचे उपप्रमुख यश शहा यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.कोश्यारी साहेब, मुख्यमंत्री मा.ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री मा. पवार साहेब, आरोग्यमंत्री मा.श्री.टोपे साहेब,गृहमंत्री मा.वळसे पाटील साहेब, विरोधी पक्षनेते,मा.फडणवीस साहेब, अल्पसंख्यांक मंत्री मा.मलिक साहेब, अल्पसंख्यांक राज्यमंत्री मा.कदम साहेब ,खासदार मा.विखे पाटील साहेब, मा.आमदार जगताप साहेब,जिल्हाधिकारी डॉ.भोसले साहेब यांना निवेदन ईमेल द्वारे तथा कार्यालयांशी संम्पर्क साधून आग्रही मागणी केली. अध्यक्ष श्री.शाह, आरोग्य राज्य मंत्री भेटी नंतर म्हणाले कि ना.आरोग्यराज्य मंत्री श्री राजेन्द्र पाटील यांनी वरील मागणी बाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली गुजराती समाज महासंघास दिली. तसेच महासंघास पुढील कार्यस शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी राज्य कार्यकारी समितीचे सदस्य श्री तेजपाल शाह, श्री अरविंद मणियार, श्री प्रकाश शाह, श्री युवराज शाह, श्री स्वप्निल शाह,श्री रोपन शाह, श्री अक्षय शाह व श्री अक्षय आलासे व इतर सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here