दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक

 दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांना पितृशोक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
अंबिकानगर (केडगाव) येथील सेवानिवृत्त तहसीलदार अरविंद दत्तात्रय तथा ए. डी. कुलकर्णी (शिंगवेकर) यांचे काल (रविवार) रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ‘समाचार’चे संपादक महेंद्र व सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी प्रमिला, दोन मुले, एक मुलगी सौ.मेधा देशपांडे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ए. डी. कुलकर्णी मूळचे कोपरगाव तालुक्यातील शिंगवे गावचे रहिवासी होते. त्यांचे महसूल खात्यात निवडणूक कायदा व भूसंपादन कायदा या विषयांवर प्रभुत्व होते. कोपरगाव, राहुरी येथे तहसीलदार व नगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. शिर्डी नगरपालिकेचे ते प्रशासक होते. दिलखुलास व हसतमुख स्वभावामुळे महसूल खाते या क्षेत्रात ते लोकप्रिय होते. निवृत्तीनंतर घरमालक संघ व ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. सकाळी अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here