कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मोफत ऑनलाईन नऊसुत्री हिलिंग सुविधा उपलब्ध - डॉ. सुधा कांकरिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मोफत ऑनलाईन नऊसुत्री हिलिंग सुविधा उपलब्ध - डॉ. सुधा कांकरिया

 कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मोफत ऑनलाईन नऊसुत्री हिलिंग सुविधा उपलब्ध - डॉ. सुधा कांकरिया


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारीची दुसरी लाट आलेली आहे. यात सर्व वयोगटातील व्यक्तीला त्रास होत आहे. लहान मुले, तरूण व्यक्तीही या आजाराने त्रस्त झाली आहेत. घर परिवारातील सर्वच सदस्य एका पाठोपाठ एक आजारी होत आहेत. या आजाराची लाट वेगाने सगळीकडे पसरत आहेत. अनेक मृत्यूमुखी पडत आहेत. स्मशानभुमीमध्ये जागा पुरत नाही. अत्यंत बिकट, भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अनेक मने धास्तावलेली आहेत. भिती, चिंता, टेन्शन, दु:ख यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होत चालली आहे व रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे रोगाची बाधा ही पटकन होऊ लागली आहे हे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. हे भेदण्यासाठी इम्युनिटी पॉवर वाढविण्याची गरज आहे. लसीकरणाने इम्युनिटी पॉवर वाढते तसेच शाकाहारी, पौष्टिक, ताजे, संतुलित हाय फायबर युक्त भोजन, नियमित व्यायाम आणि शांत व पुरेशी झोप. या त्रिसुत्रीमुळे शारिरीक इम्युनिटी पॉवर वाढते परंतू या सोबतच मानसिक इम्युनिटी पॉवर वाढविण्याची गरज आहे व तिथेच आपण कमी पडत आहोत. मनातील भिती, काळजी, चिंता, दु:ख यामुळे मानसिक रोगप्रितकार शक्ती कमी होऊन त्यामुळे शारिरीक रोगप्रतिकार शक्ती ही कमी होत आहे. आणि म्हणूनच रोग अधिक पसरण्याची भिती निर्माण झाली आहे.
शासनाचे सर्व नियम म्हणजे मास्क लावणे, हात धुणे, यथायोग्य अंतर पाळणे या सर्व बाबींचे पालन करायचे आहेच परंतू मानसिक इम्युनिटी वाढविण्यासाठी नऊसुत्री हिलिंगच्या सुविधा ज्या ऑनलाईन आणि मोफत आहेत या सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती राजयोगा हिलर ग्रुपच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली. यात नऊ प्रकारच्या सुविधा आहेत. 1) राजयोगा मेडिटेशन 2) सेल्फ हिलिंग 3) कौन्सिंलिंग 4) डिस्टंट हिलिंग 5) हिलिंग फुड 6) हिलिंग वॉटर 7) हिलिंग व्यायाम 8) शांत झोप येण्यासाठी स्लिप मॅनेजमेंट 9) कोरोना आजारा विषयी शास्त्रशुध्द माहिती या विषयीचे मार्गदर्शन ऑनलाईन मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत असेही डॉ. सुधा कांकरिया यांनी सांगितले आजपर्यंत सात हजार पेक्षा जास्त व्यक्तींनी याचा लाभ घेतला आहे. या मुळे मानसिक रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत होणार आहे. या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी 9850887838 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment