पंचगंगा सीड्स उद्योग समूहाकडून भेंडा कोविड सेंटरला शंभर बेडची देणगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

पंचगंगा सीड्स उद्योग समूहाकडून भेंडा कोविड सेंटरला शंभर बेडची देणगी

 पंचगंगा सीड्स उद्योग समूहाकडून भेंडा कोविड सेंटरला शंभर बेडची देणगी


नेवासा ः
कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमधील सुविधांवर मर्यादा येत आहे. गॅससिलेंडर, मास्क, सॅनेटायझर यासारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने दानशूर व्यक्तीने तालुक्यातील  शासकीय सेंटर मधील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले.
भेंडा येथील श्री संत नागेबाबा भक्त निवासमध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटर करिता पंचगंगा सीड्स  कंपनीने 100 बेडची देणगी दिली. पंचगंगा सीड्सचे उद्योजक तरुण श्री. प्रभाकर उत्तमराव शिंदे व काकासाहेब उत्तमराव शिंदे यांनी भेंडा येथे तहसीलदार श्री सुरणा यांच्याकडे 100 बेड्स सुपूर्त केली. यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, कुकाणा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री कीर्तने, डॉक्टर योगेश साळुंखे, यांच्यासह बाजार समितीचे सभापती डॉक्टर शिवाजीराव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना तहसीलदार सुराणा म्हणाले, भेंडा येथील शासकिय कोविड  केअर सेंटर मध्ये आज अखेर 162 रूग्ण डमिट आहेत काही रुग्णांना कॉट गादी बेड शिल्लक नव्हते ही अडचण ओळखून उद्योजक श्री शिंदे बंधू यांनी 100 बेड उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे येथील एकूण बेड संख्या 250 झाली असून अजून 250 बेडची आवश्यकता आहे. तसेच गॅस सिलेंडर, मास्क, सॅनेटायझर ची सुद्धा आवश्यकता आहे. तालुक्यात रुग्णवाहिका काही कमी पडत आहेत.कोणी प्रायोजक असेल तर आणखी दोन रुग्णवाहिकांची मदत करावी.रोख रक्कम न देता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन वस्तू रूपाने मदत करावी असे आवाहन ही तहसीलदार श्री सुराणा साहेब यांनी केले आहे.
श्री.शिंदे बंधूनी भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटरला पंचगंगा सिड्सच्या वतीने 100 बेडचे दान देऊन एक डोळस सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.सध्या मोठमोठी मंदिरे, देवस्थाने मठ,चर्च,मशीद इ.धार्मिक ठिकाणी भरघोस दान देणारे दानशूर समाजात आहेत. त्यामध्ये अवैधरित्या मिळवलेल्या संपत्तीतून दान करणार्‍यांची संख्या अधिक असते,त्यामागे त्यांचा पापक्षालन हाही त्यांचा उद्देश असु शकतो परंतु, पंचगंगा सिड्सने  योग्य वेळी आज काळाची खरी गरज लक्षात घेऊन योग्य ठिकाणी सढळ हाताने मदत करून समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.  समाजातील इतर दानशूर देखील आपला आदर्श घेऊन अशाच पद्धतीने यापुढे काळाची गरज ओळखून योग्य ठिकाणी दान करतील.आज कोरोनाचा प्रादुर्भावामुळे समाजातील गोरगरिबांना दवाखान्यात बेड व इतर सुविधा उपलब्ध होत नाहीत. आपल्या या दानाने समाजातील असंख्य गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचणार आहेत व तेच आपल्यासाठी फार मोठे आशीर्वाद ठरतील. आपले आजपर्यंतचे पंचगंगा सीड्च्या माध्यमातून असलेले सामाजिक कार्य सर्वश्रुत तर आहेच पण यापुढेही आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती व भरभराट होत राहो अशा सदिच्छा देऊन सकल मराठा सोयरीक ग्रृपचे जयकिसन वाघपाटील, मायाताई जगताप, रजनीताई गोंदकर,  बाळासाहेब वाकचौरे, लक्ष्मण मडके,शितल चव्हाण,नंदा वराळे  संपदाताई ससे,हरीभाऊ जगताप, राजाभाऊ सरमाने यांनी पंचगंगा उद्योग समुहाचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment