कर्जतमध्ये 350 बेडचे नवीन कोरोना सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 8, 2021

कर्जतमध्ये 350 बेडचे नवीन कोरोना सेंटर

 कर्जतमध्ये 350 बेडचे नवीन कोरोना सेंटर 

आ रोहित पवार यांचा पुढाकार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना उपचार करता यावेत, यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत शहराजवळील गायकवाडी या ठिकाण 350 बेडचे नवीन कोरोना सेंटर स्वतः उभा केले. आज त्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्याची पाहणी केली.
मतदारसंघांमध्ये अकराशे बेड व त्यांच्यासाठी ऑक्सिजन, पाणी, जेवण अशी संपूर्ण व्यवस्था आमदार रोहित पवार यांनी केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील कोरोना रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी यावेळी उपचारासाठी आवश्यक असणारे औषधे व इतर बाबींचा देखील अधिकार्‍यांशी चर्चा करून आढावा घेतला.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, ’पुणे मुंबई येथे असलेल्या सेंटरप्रमाणे कर्जतमध्ये कोविड सेंटर आपण सुरू करीत आहोत. कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. आपण मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढताना दिसून येते. त्यांना ऍडमिट करण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी नवीन तीनशे पन्नास बेडचे व्यवस्था याठिकाणी करीत आहोत. मतदारसंघांमध्ये आतापर्यंत अकराशे बेड तयार केले आहेत. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. टेस्टिंग करावी आणि प्रतिबंधात्मक लस देखील घेण्याची गरज आहे.
यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, आरोग्य अधिकारी डॉ संदीप गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, भास्कर भैलुमे, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा डॉ शबनम इनामदार, राजश्री तनपुरे, सचिन सोनमाळी, दीपक यादव, सचिन धांडे, समाधान खामकर, पृथ्वीराज चव्हाण, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment