खाजगी दवाखान्याना रेमडीसीविर ची जबाबदारी सक्तीची करावी ः श्रीनिवास बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

खाजगी दवाखान्याना रेमडीसीविर ची जबाबदारी सक्तीची करावी ः श्रीनिवास बोज्जा

 खाजगी दवाखान्याना रेमडीसीविर ची जबाबदारी सक्तीची करावी ः श्रीनिवास बोज्जा


अहमदनगर ः
अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूने हैदोस घातलेला असून नागरिक भयभीत झालेले आहेत. अशा परिस्थितीत जे रुग्ण खाजगी दवाखान्यात एडमीट आहेत त्यांना तेथील डॉक्टरांना रेमडीसीविर इंजेकशनची व्यवस्था करणे सक्तीचे करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. राजेश टोपे,आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य,मुंबई  व  मा. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर  यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.
 सध्या नगर शहरातील खाजगी दवाखान्या मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत . परंतु सदर दवाखान्यामध्ये रॅमिडीसीवर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने तेथील डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाना इंजेकशनची उपलब्धता कुठुन ही करा असे सांगतात, त्यामुळे सदर रुगणाचे नातेवाईक सैरभैर फिरून वेळ आली तर जास्त पैसे देऊन इंजेकशन उपलब्ध करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे  तर काही रुग्णाच्या नातेवाईकाना इंजेकशन  उपलब्ध न झाल्याने भयभीत झालेले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने जनतेला वार्‍यावर सोडून न देता सहकार्य करून या संकटांतून बाहेर काढावे. जर असे न झाल्यास याचा विद्रोह झाल्याशिवाय राहणार नाही. या करिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर रॅमिडीसीवर  इंजेकशन बाबत सखोल चौकशी करून यात काही गैरव्यवहार वा काळाबाजार होत नाही याची खबरदारी व दक्षता घ्यावी.

No comments:

Post a Comment