श्यामली मगरची ज्ञानप्रबोधिनीसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, April 17, 2021

श्यामली मगरची ज्ञानप्रबोधिनीसाठी निवड

 श्यामली मगरची ज्ञानप्रबोधिनीसाठी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः महाराष्ट्र राज्यात अव्वल असणार्‍या पुणे येथील सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या इयत्ता पाचवी प्रवेश परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातून पारनेर तालुक्यातील गुरुदेव इंग्लिश स्कूल सुपा (एमआयडीसी) येथील श्यामली संतोष मगर हिची निवड झाली आहे. पाचवी प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 800 विद्यार्थी व विद्यार्थिनीं मधून 80 विद्यार्थी निवडले गेले त्यामध्ये श्यामली ची निवड झाली आहे. या परीक्षेचे विशेष म्हणजे परीक्षेचा कोणताही पॅटर्न न सांगता अभ्यासक्रम न देता मुलांची बुद्धिमत्ता, आकलन क्षमता, कलचाचणी घेऊन दोन राउंड मधून मुलांची निवड केली जाते.श्यामलीला प्राचार्य अविनाश भिंगारदिवे, वर्षा पाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे आमदार निलेश लंके, माजी सभापती दीपक पवार, सरपंच रेश्मा पवार यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment