अजब! ओडिशात जन्मली तीन हात, दोन डोकं असणारी जुळी बाळं ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

अजब! ओडिशात जन्मली तीन हात, दोन डोकं असणारी जुळी बाळं !

 अजब! ओडिशात जन्मली तीन हात, दोन डोकं असणारी जुळी बाळं !


नवी दिल्ली ः
ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्हातील एका रुग्णालयात महिलेने 2 डोके आणि 3 हात असणार्‍या जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या रविवारी सकाळी केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात या दुर्मिळ बाळांचा जन्म झाला आहे. या जुळ्या बाळांची दोन डोकं आणि तीन हात आहेत. मात्र दोघींच शरीर एकच आहे. या बाळांची स्थिती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु या बाळांची चिंता त्यांच्या आई वडिलांना सतावत आहे.
या बाळांना जन्म देणार आई वडील राजनगर क्षेत्रातील कानी या गावात अत्यंत गरीब परिस्थितीत राहतात. या बाळांची आई दुसर्‍यांदा आई झाली आहे. परंतु या दुसर्‍या प्रसुतीनंतर जन्माला आलेल्या या जुळ्या बाळांना कसे सांभाळायचे याची चिंता आई-वडीलांना सतावू लागली आहे. त्यामुळे बाळाच्या वडिलांनी ओडिशा सरकारकडे बाळासाठी मदतीची मागणी केली आहे. परंतु या बाळांना मदत करण्याची अद्याप कोणतीही घोषणा ओडिशा सरकारकडून केली नाही.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, ही एक दुर्मिळ चिकित्सा आहे. या बाळांचे दोन्ही तोंड आणि नाक चांगल्याप्रकारे विकसित झालं आहे. तसेच डोकंही पूर्णपणे विकसित झालेले आहे. बाळाला दोन्ही तोंडातून खायला घातलं जातं आहे. शिवाय दोन्ही नाकांनी बाळाचा श्वासोच्छवास सुरू आहे. या बाळाचं ऑपरेशन करुन वेगळे केले जाऊ शकते. असा विश्वास डॉक्टरांना आहे. या महिलेला सिजेरिअनसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही सिजेरिअन झाल्यानंतर तिला केंद्रपाडा जिल्ह्यातील मुख्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर विशेष देखभालीसाठी बाळाला कटक येथील सरदार वल्लभभाई पटेल पीजी इंन्स्टिस्टुट ऑफ पेडियाट्रिक्स याठिकाणी हलवण्यात आलं आहे. या बाळांची प्रकृती स्थिर आहे. केंद्रपाडा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, हे प्रकरण सियामीज ट्विन्सचं आहे. त्यामुळे त्यांचे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर या मेडिकल स्थितीबद्दल कळेल. यापूर्वीही उत्तर प्रदेशतील जय देवी रुग्णालयात जुळ्या बाळांनी जन्म घेतला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here