आ.निलेश लंकेच्या माध्यमातून दुसर्‍यांदा भाळवणीत 1 हजार 100 बेडचे कोव्हिड सेंटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, April 13, 2021

आ.निलेश लंकेच्या माध्यमातून दुसर्‍यांदा भाळवणीत 1 हजार 100 बेडचे कोव्हिड सेंटर

 आ.निलेश लंकेच्या माध्यमातून दुसर्‍यांदा भाळवणीत 1 हजार 100 बेडचे कोव्हिड सेंटर

शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात मिळणार सर्व सुविधा, बुधवारी भीम जयंतीच्या मुहूर्तावर लोकार्पण

जनतेच्या सेवेसाठी कोव्हिड योध्दा म्हणून रणांगणात आमदार निलेश लंके
कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील परिस्थिति गंभीर होत आहे व तालुक्यात पण मोठ्या प्रमाणात कोविड चे पेशंट सापडत आहे अशा वेळी माझ्या माय-बाप जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेता आपण अत्याधुनिक सुसज्ज असे शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने कोव्हिड सेंटर पुन्हा एकदा भाळवणी येथे चालू करीत आहे.गेल्या वर्षी आपण कर्जुले हर्या या ठिकाणी आदर्शवत कोव्हिड सेंटर चालू केले होते.या कोव्हिड सेंटरची नोंद राज्याने घेतली होती. त्याची पोहोच पावती म्हणून लोकमत ने ’महाराष्ट्रीय पॉलिटिक्स ऑफ द ईयर’ या पुरस्कार ने सन्मानित केले.नक्कीच पुन्हा एकदा जोमाने काम करुन या कोरोना वायरस च्या विरोधात लढून हद्दपार करू. - आमदार निलेश लंके, विधानसभा सदस्य - पारनेर,नगर मतदारसंघ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः मी असुरक्षित असलो तरी चालेल परंतु माझी माय - बाप जनता असुरक्षित असता कामा नये ही भावना कोरोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जपली आहे.त्यामुळे बेड मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही उपचार नाही यासारखे दिवसभरात हजारो फोन येत आमदार निलेश लंके यांना येत असल्याने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 4  वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखर्णा जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे  यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व दैनिकांच्या संपादकांच्या उपस्थित पुन्हा एकदा 1 हजार 100 बेडच्या कोव्हिड सेंटरचा शुभारंभ होणार आहे.यामध्ये 100 ऑक्सिजन बेडचा सामावेश असुन लसीकरणाची सोय याठिकाणी करण्यात आली असून मोफत उपचार या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍याला लाटेमध्ये रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याला पारनेर - नगर मतदार संघ सुद्धा अपवाद राहिलेला नाही. येथेही रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची हाल होऊ नये त्यांना योग्य व मोफत उपचार मिळावेत यासाठी आमदार निलेश लंके यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.सर्वसामान्य रुग्णांची होणारी परवड पाहून आमदार निलेश लंके यांनी गेल्या वर्षी कर्जुले हर्या या ठिकाणी 1 हजार बेडचे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदीर या नावाने कोव्हिड सेंटर सुरू केले. येथे साडेचार हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी मोफत उपचार घेतले. सामान्य रुग्णांचे कोट्यावधी रुपये वाचले. रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले. यामध्ये,प्रत्येक रुग्णांकरीता स्वतंत्र थर्मास,मास्क, स्टीमर,नॅपकिन,पाणी बाटली,साबण इत्यादी मूलभूत सुविधा रुग्णांना दिल्या जाणार.24 तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी व वापरण्या साठी गरम पाणी.
या केअर सेंटर मध्ये बनविलेले सकस जेवण, ज्यामध्ये दूध,अंडी,सूप, पोषक आहार व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे यावेळी दिले जाणार आहेत.
सलग दुसरा वर्षी गेल्या काही दिवसापासून कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. पारनेर -नगर मध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडू लागले आहेत. कुटुंबची  कुटुंब या आजाराने बाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अनेकांचा खिशाला परवडणारे नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी या रुग्णांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी सामाजिक धाव घेतली आहे. कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी पुन्हा एकदा कोविड  केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसहभागातून पुन्हा एकदा प्रशस्त स्वरूपाचा सेंटर उभारण्याचा संकल्प आमदार निलेश लंके यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव निलेश लंके प्रतिष्ठान व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवला. लागलीच सर्वांनी यासाठी पाठिंबा दर्शवत कामाला सुरुवात केली. यासाठी खाजगी प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडूनही सहयोग दिला जाणार आहे.
भाळवणी या ठिकाणी सुरु करण्यात येणारे कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयी सुविधा युक्त असणार आहे. पूर्वीप्रमाणे येथेही उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जेवणापासून इतर सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यानुसार नियोजन करण्याचे काम सुरू आहे. येथे ऑक्सीजन बेडचीही व्यवस्था असणार आहे.
मागील वर्षी टाकळीढोकेश्वर या ठिकाणी जे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले होते.तेथील व्यवस्थापनाची जबाबदारी निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलली होती. त्याच पद्धतीने येथेही संबंधितांकडून उत्तम मॅनेजमेंट केले जाईल .भाळवणी येथील प्रस्तावित शरद चंद्रजी आरोग्य मंदिरात जे कोरोना रुग्ण दाखल  होतील त्यांच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने वैद्यकीय उपचार केले जातील. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी उपलब्ध असेल. वैद्यकीय उपचारांबरोबरच योगा  आणि मेडिटेशनची थेरपी केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने प्रांत अधिकारी डॉक्टर सुधाकर भोसले तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here