मंत्री पदासाठी आ. रोहित पवारांना राज्यातील युवांची पसंती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

मंत्री पदासाठी आ. रोहित पवारांना राज्यातील युवांची पसंती.

 मंत्री पदासाठी आ. रोहित पवारांना राज्यातील युवांची पसंती.नगरी दवंडी

जामखेड - गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असून, नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर समाजमाध्यमांतून महाविकास आघाडीतील युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. आगामी काळात नव्या युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदाची संधी दिली तर, राज्यात विकासाची नवी नांदी होईल; अशी चर्चा समाजमाध्यमांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येत नाही तोच, कोरोनाचा कालावधी सुरु झाला. दुसरीकडे विरोधी पक्षानेही सत्ताधारी पक्षावर विविध आरोप प्रत्यारोप केले. संजय राठोड प्रकरण असूदेत की, सचिन वाझे प्रकरणाच्या चौकशीत नाव आल्याने अनिल देशमुख यांनी दिलेला गृहमंत्री पदाचा राजीनामा असूदेत, या सर्व घडामोडींचे माध्यमांमध्ये व समाजमाध्यमांमध्ये विविध पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पुरे झाले म्हणत जुन्या दमाच्या लोकप्रतिनिधींऐवजी नव्या दमाच्या युवा लोकप्रतिनिधींना मंत्री पदासाठी राज्यात संधी देण्याची मागणी फेसबुक, व्टिटरसारख्या इतर समाजमाध्यमांमध्ये जोर धरत आहे. आगामी काळात राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता तळागाळातून आलेला, लोकहितासाठी सक्षम असणारा, जनतेचे प्रश्न जाणणारा असा युवा लोकप्रतिनिधी आमदार हवा असल्याचे मत तरूण व ज्येष्ठ समाजमाध्यमातून व्यक्त करत आहेत. या चर्चेतून एका युवा आमदाराचे नाव समोर येत आहे, ते नाव म्हणजे ‘आ. रोहित राजेंद्र पवार’’ होय.


आ. रोहित राजेंद्र पवार हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून आले. परंतु अल्पावधीतच त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे राज्यातील प्रत्येक अबावृध्दाच्या मनात आ. रोहित पवारांविषयी आदराचे, आपुलकीचे स्थान निर्माण झाले आहे. आपल्या कर्जत जामखेडमधील जनतेसह राज्यातील प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. रोहित पवार कटीबध्द असतात. आपला हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आ. रोहित पवार यांच्याकडे पाहतो. आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघ एक आव्हान म्हणून स्विकारत पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारख्या सर्वसुविधांनी युक्त आदर्शवत नगररचना अर्थात बारामतीप्रमाणेच ‘’कर्जत जामखेड पॅटर्न’’ चा देखील राज्यात नावलौकिक व्हावा, यासाठी ते कार्यरत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून अभ्यासूपणे मुद्दे मांडत राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यास रोहित पवार सक्षम आहेत. लोकांमध्ये मिसळून लोकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यास प्राधान्य देणारा हा लोकनेता आहे. भाजपसारख्या इतर विरोधीपक्षांसाठी पूरक ठरणारा, राज्यात महाविकासआघाडी सरकारचं प्रतिनिधीत्व करणारे रोहित पवार हे एक युवा नेतृत्व आहेत. 

त्यामुळे पुढील काळात राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यात जुन्या चेह-यांऐवजी युवा आमदार रोहित पवार यांना मंत्री म्हणून संधी दिली जावी, अशी मागणी विविध पोस्ट, व्टिटर कमेंटव्दारे समाजमाध्यमांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

No comments:

Post a Comment