ब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, April 4, 2021

ब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद

 ब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध!नगरी दवंडी


अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

 राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल.

उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत.  कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here