राज्याच्या अर्थसंकल्पाचे श्रीगोंद्यात स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

राज्याच्या अर्थसंकल्पाचे श्रीगोंद्यात स्वागत

 राज्याच्या अर्थसंकल्पाचे श्रीगोंद्यात स्वागत

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री मा. ना. अजित पवार यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळ व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यासाठी अर्थसंकल्पात प्रत्येकी 100 कोटी रुपयांची तरतूद केली. याशिवाय क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाबाबत बैठक घेऊन ते वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले.
   महामंडळांच्या निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयदेव गायकवाड तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप व सर्व पदाधिकरी तसेच समाज बांधवांनी  जल्लोष साजरा केला.

No comments:

Post a Comment