मिरावली पहाड येथील संदल ऊरुस स्थगित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

मिरावली पहाड येथील संदल ऊरुस स्थगित

 मिरावली पहाड येथील संदल ऊरुस स्थगित


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः सालाबादप्रमाणे मौजे कापुरवाडी येथे सोमवार दि.13 व मंगळवार दि.16 रोजी ह.सय्यद जैनुल आबेदीन जलालबाबा उर्फ छोटेबाबा दर्गाचा संदल व ऊरुसचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ट्रस्ट व मुजावरच्यावतीने सर्व धार्मिय भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशाप्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनने कळविल्याप्रमाणे संदल ऊरुस व भंडारा कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. भाविकांनी संद ऊरुस रद्द झाल्यामुळे आपण मिरावली पहाडावर सदर दिवशी येऊ नये, असे आवाहन दर्गा ट्रस्टचे वंशावळ विश्वस्त आसिफ पीरखान पठाण, चेअरमन हाजी अन्वर खान, सदय्य हमीद रुस्तुम, खादीम मुजावर हाजी गोटू जहागिरदार, शेख अब्दुल रऊफ (बाबा) जहागिरदार, हाजी फक्ररोद्दीन जहागिरदार, शेख इरफान आणि शेख इम्रान जहागिरदार, शेख साहेबान जहागिरदार, शेख फैजान बाबा जहागिरदार आदिंनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here