शिवसेनेचे मुन्नाभाई चक्रनारायण यांच्या सारस अमृततुल्यचं दिमाखात उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

शिवसेनेचे मुन्नाभाई चक्रनारायण यांच्या सारस अमृततुल्यचं दिमाखात उद्घाटन

 शिवसेनेचे मुन्नाभाई चक्रनारायण यांच्या सारस अमृततुल्यचं दिमाखात उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः नेवासकरांसाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री मुन्नाभाई चक्रनारायण यांच्या  बहुचर्चित अशा सारस अमृततुल्यचं शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री.हरिभाऊ शेळके यांच्या हस्ते आज मोठया दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
    यावेळी सारस अमृततुल्यचे डायरेक्टर श्री. स्वप्नील खांडेकर यांनी सांगितले की ,नवनवीन संकल्पना राबवताना चहाच्या या क्षेत्रांमध्ये स्पर्धा खूप वाढली आहे, पण सारस अमृततुल्य ने आपली गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी आता नवनवीन आणि वैविध्यपूर्ण लेमन टी, आइस टी,बाजारात उतरवले आहेत.आणि त्यामुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आता सारस अमृततुल्यला मिळत आहे.श्री ज्ञानेश्वर महाविद्यालया समोरच असलेल्या या नवीन दालनाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
   यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री.  रावसाहेब कांगुणे, उपसभापती  किशोर जोजार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरिभाऊ शेळके, रामदास भाऊ गोल्हार ,नेवासा नगर पंचायतचे नगराध्यक्ष सतीश  पिंपळे,ज्ञानदीप स्कूलचे प्राचार्य श्री पॉल भिंगारदिवे सर  ,उपनगराध्यक्ष लक्ष्मण मामा जगताप, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, मच्छिंद्र पा. म्हस्के, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री साहेबराव घाडगे पाटील ,केतन देशमुख,बाळासाहेब पवार,विजय गाडे,माजी प्राचार्य आगळे सर,नंदकुमार पाटील नारायण लष्करे आदी नेत्यांनी उपस्थिती लावून श्री. मुन्नाभाई चक्रनारायण आणि उमेश चक्रनारायण यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी संतोष चक्रनारायण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here