साई संस्थानला उच्च न्यायालयाचा झटका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

साई संस्थानला उच्च न्यायालयाचा झटका.

 साई संस्थानला उच्च न्यायालयाचा झटका.

कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य.
शिर्डी- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हूराज बगाटे यांची  करण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य असल्याचं सांगत न्यायालयानं साई संस्थानाला मोठा झटका दिलाय. नियमांचं पालन न करताच ही नियुक्ती करण्यात आल्याचं स्पष्ट करत यापुढे नियम पाळूनच सीईओंची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
   शिर्डीतील माजी विश्वस्त उत्तम शेळके यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. शिर्डी संस्थानासाठी विश्वस्त मंडळ नेमण्याबाबत ही याचिका होती. त्यावर अंतरिम आदेशान्वये उच्च न्यायालयाने प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, अतिरिक्त आयुक्त नाशिक , सह धर्मादाय आयुक्त नगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी यांची समिती गठीत करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार व आदेश दिले होते.
    याच आदेशांमध्ये शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सनदी अधिकारी असावेत, असं स्पष्ट कऱण्यात आलं होतं. कान्हूराज बगाटे यांची ज्यावेळी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा ते आयएएस नव्हते, हे सिद्ध झाल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. शासनाने नियमांचं कठोर पालन करावं, असं सांगत न्यायालयानं जोरदार ताशेरे ओढले.

No comments:

Post a Comment