दिलीप गांधी ‘रेडिमेड’ नव्हे तर ‘स्वकर्तृत्ववान’ नेता - राजेंद्र दर्डा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

दिलीप गांधी ‘रेडिमेड’ नव्हे तर ‘स्वकर्तृत्ववान’ नेता - राजेंद्र दर्डा

 सकल जैन समाज व जैन अल्पसंख्याक महासंघाची ऑनलाइन सभेव्दारे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली

दिलीप गांधी ‘रेडिमेड’ नव्हे तर ‘स्वकर्तृत्ववान’ नेता - राजेंद्र दर्डा    

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः दिलीप गांधी हे अल्पसंख्याक होते. मात्र, त्यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन व्यापक राजकारण केले. उद्योजक, व्यापारी, शेतकरी, तरुण अशा सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले. त्यांना राजकीय वारसा व गॉडफादर नव्हता. ते ’रेडिमेड नेता’ नसून स्वकर्तृत्वाने पुढे आले होते, अशा भावना माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केल्या.
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सकल जैन समाज व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने ऑनलाइन श्रद्धांजली सभा घेतलीया सभेत दर्डा यांनी गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
   शोकसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, आमदार गीता जैन, आमदार अतुल सावे, जैन समाजाचे ज्येष्ठ नेते निर्मल सेठी, अखिल भारतीय मारवाडी समाजाचे नेते रमेश बंग, संतोष मंडलेचा, सुभाष ओसवाल, माजी न्यायमूर्ती एन.के. जैन, मनिंदर जैन, डॉ. गोपाल मोर, विमल रांका, गणपत भन्साळी, जे.के. जैन, डॉ. रीचा जैन, धनपट मालू, राजेंद्र बाठिया, महावीर भन्साळी, मुकेश चव्हाण (आंध्र प्रदेश), उत्तमचंद्र गोटी (तामिळनाडू), ललित जैन, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अतिक खान आदींसह विविध राज्यांतील मान्यवरांनी सभेत आपल्या भावना व्यक्त केल्या.दिलीप गांधी यांची पत्नी सरोज गांधी यांनी यावेळी भावना व्यक्त करताना आपला मुलगा सुरेंद्र हा पतीची उणीव भरून काढत सामाजिक योगदान देत राहील, असे सांगितले. ललित गांधी व संदीप भंडारी यांनी सभेचे संयोजन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here