बॉयफ्रेंडचा त्रास, गर्लफ्रेडची आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

बॉयफ्रेंडचा त्रास, गर्लफ्रेडची आत्महत्या

 बॉयफ्रेंडचा त्रास, गर्लफ्रेडची आत्महत्या


संगमनेर ः
बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून एका गर्लफ्रेडने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना संगमनेर खुर्द परिसरात गुरुवारी घडली.

   याप्रकरणी तरुणीचा बॉयफ्रेंड याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर खुर्द शिवारात राहत असलेल्या एका 20 वर्षीय युवतीला श्रीराम राजा लोखंडे याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमातूनच श्रीराम लोखंडे याने तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले होते. दरम्यान सदर युवतीला घरी पाहुणे पाहण्यासाठी आले. त्या दरम्यान श्रीराम याने संबंधीत प्रेयसीचे  फोटो मित्राचे मोबाईलवर सेंड करुन तसेच तिला पाहण्यास आलेल्या पाहुणे यांना ते फोटो दाखवून तिची बदनामी केली.या त्रासाला कंटाळून सदर युवतीने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत मयत युवतीच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here