महिला सक्षमीकरणासाठी नेवासा काँग्रेस कटीबद्ध ः माळवदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

महिला सक्षमीकरणासाठी नेवासा काँग्रेस कटीबद्ध ः माळवदे

 महिला सक्षमीकरणासाठी नेवासा काँग्रेस कटीबद्ध ः माळवदे

महिला दिनानिमित्त नेवासा काँग्रेसकडून विविध उपक्रम

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना सक्षम करण्यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित महिला सक्षमीकरण सप्ताहाच्या निमित्ताने बकुपिंपळगांव येथे संपन्न झालेल्या श्रमिक महिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
   जागतिक महिला दिन प्रित्यर्थ नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने तालुक्यातील बकुपिंपळगांव येथील दुर्बल घटकांतील श्रमिक महिलांचा साडी-चोळी देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम होते. याप्रसंगी नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संघटक संदीप मोटे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष चंद्रशेखर कडू, युवकचे कार्याध्यक्ष आकाश धनवटे, एनएसयुआयचे सौरभ कसावणे, समिर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माळवदे यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नांचा आढावा घेऊन शासनस्तरावरुन त्यांच्या उन्नती व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांची सविस्तर माहिती दिली. कौटुंबिक व सामाजिक जीवनात महिलांना येणार्‍या अडचणी त्यांनी निर्भीडपणे निदर्शनास आणून दिल्यास त्या सोडविण्यासाठी नेवासा तालुका काँग्रेस कमिटी अग्रक्रम देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महिला सक्षमीकरण सप्ताहांतर्गत तालुक्यातील महिलांचा लवकरच मोठा मेळावा घेऊन त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणार असल्याचेही माळवदे यांनी यावेळी सांगितले. तसेच वंचित घटकांतील महिलांना कुटीर उद्योग करुन जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरु करुन त्यांना बँकांमार्फत बीजभांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आखणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
    कार्यक्रमाप्रसंगी  ताराबाई मिसाळ, कौशल्याबाई मिसाळ, पुंजाबाई उमाप, मनिषा उमाप, साखरबाई अढागळे, ताराबाई मिसाळ आदींसह बकुपिंपळगांव परिसरातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव यांनी केले तर तालुका उपाध्यक्ष सुनील भोगे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment