पोस्टमार्टम रिपोर्ट व पंचनामा प्रत देण्यासाठी मागितली लाच. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

पोस्टमार्टम रिपोर्ट व पंचनामा प्रत देण्यासाठी मागितली लाच.

 पोस्टमार्टम रिपोर्ट व पंचनामा प्रत देण्यासाठी मागितली लाच.

अ‍ॅन्टी करप्शनकडून पोलीस नाईक गजाआड.

नेवासा-
अपघाती निधन झालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या नातेवाईकांना शवविच्छेदन अहवाल व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करणार्‍या नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सोमनाथ कुंढारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेवासा पोलीस ठाण्यात सापळा लावून 10 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. गुन्हा दाखल करून कुंढारे यास अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेची हकीकत अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील ऊसतोड कामगारांच्या नातेवाईकाचे नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अपघाती निधन झाले होते याबाबत नेवासा ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. याबाबतचा तपास पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे यांच्याकडे होता. पोलीस नाईक कुंढारे यांच्याकडे ऊसतोड कामगारांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन अहवाल आणि पंचनाम्याची प्रताची मागणी केली असता पोलीस नाईक कुंढारे यांनी हे कागदपत्र देण्यासाठी मयत ऊसतोड कामगारांच्या नातेवाईकाकडे पंधरा हजार रुपयाची मागणी केली.
   शेवटी तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाकडे तक्रार देण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेवासा पोलीस ठाणे येथे सापळा लावून पोलीस नाईक कुंढारे याला तक्रारदाराकडून दहा हजार रुपयेची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे अधिकारी, पोलिस निरीक्षक उज्वल कुमार पाटील यांच्यासह निरीक्षक चंद्रसेन पालकर, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बाविस्कर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment