पत्नीचे अंगावर अ‍ॅसीड फेकणार्‍या पतीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

पत्नीचे अंगावर अ‍ॅसीड फेकणार्‍या पतीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा.

 पत्नीचे अंगावर अ‍ॅसीड फेकणार्‍या पतीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा.

10 वर्ष सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पत्नीच्या अंगावर सल्फ्युरिक अ‍ॅसीड फेकून तिला जखमी करणार्‍या श्रीकांत आनंदा मोरे, रा. प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार यास जिल्हा सत्र न्यायाधीश अशोक भिलारे यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद दुसर्‍या एका कलमाखाली 1 महिना सक्तमजुरी व रक्कम रुपये 500/- दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली, तसेच सदर दंडाच्या रक्कमेपैकी 40,000/- रूपये पिडीतेस देण्याचा व उर्वरीत दंड सरकार जमा करण्याचा आदेश पारीत केला.
या घटनेची थोडक्यात हकिगत अशी की, पिडीत महिला हिला आरोपीपासुन 2 मुले झाली असुन आरोपी हा महिलेस कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद करून त्रास देत असे. आरोपीच्या सततच्या वागण्यामुळे पिडीत महिला ही आरोपीपासुन वेगळी तिच्या आईकडे राहत असे. दि.03 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी 05:00 ये सुमारास यशवंतनगर येथील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेत काम करणार्‍या शिक्षकाबरोबर तिच्या मुलास शाळेतुन आणण्यासाठी पीडित महिला जात असताना श्रीकांत मोरे हा आडवा आला व शिक्षकाची गाडी थांबवुन पिडीतेस गाडीवरून खाली उतरविले व शिक्षकास निघुन जाण्यास सांगितले.
   शिक्षक निघुन गेल्यानंतर पिडीतेबरोबर 4 ते 5 पावले चालल्यानंतर त्याने खिशातुन एक बाटली काढली व म्हणाला. थांब आता तुला जीवे ठार मारतो. त्यानंतर त्याने बाटलीतील सल्फ्युरिक अ‍ॅसीड तिच्या डोक्यावर ओतले. त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये, मानेवर, पाठीवर, छातीवर सदर अ‍ॅसीड ओघळल्याने तिला भाजले व त्यामुळे तिला मरणयातना होवु लागल्या. त्या अवस्थेत पिडीत महिला रस्त्यावर काही वेळ पडुन राहिली. त्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकुन तिला सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती जिल्हा रूग्णालयाने पोलीसांना कळविल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे स.पो. नि.देशमाने यांनी रूग्णालयात जावुन फिर्यादी पिडीतेचा जबाब नोंदविला. या भिंगार कम्प पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुध्द 307, 326 अ, 341 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्हयाचा तपास स.पो.नि.एस.पी.कवडे यांनी केल्यानंतर आरोपीविरूध्द मा न्यायालयात आरोपीविरूद दोषारोपपत्र दाखल केले हा खटला हा मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश क. 1 अशोककुमार भिलारे यांचे न्यायालयात चालला.     खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी.केळगद्रे शिंदे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने एकुण 06 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिक्षक, वैद्यकिय अधिकारी, तपासी अंमलदार, विशेष न्यायदंडाधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी - पुरावा व सरकार पक्षाने महिलांचा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येत नाही. अ‍ॅसीड हल्ल्यामुळे पिडीतेचे शारिरीक व मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाव्यात व समाजातील विकृत मानसिकतेमध्ये सुधारणा व्हावी असा केलेला युक्तिवाद ग्राहय धरून मा न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी 40,000/- रूपये पिडीत महिलेस देण्याचा आदेश पारीत केला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी कामकाज पाहिले. खटल्याच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. मारुती ए.थोरात यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here