गृहमंत्री अनिल देशमुखांचे ट्वीट... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

गृहमंत्री अनिल देशमुखांचे ट्वीट...

 गृहमंत्री अनिल देशमुखांचे ट्वीट...

‘दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे’

मुंबई :
’परमबीर सिंग  यांनी केलेल्या आरोपाबाबत आपली चौकशी करा’, अशी मागणी वर्षावरील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. माझी चौकशी करा, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे, असे देशमुख यांनी ट्विट करताना म्हटले आहे. दरम्यान, चौकशीसाठी आता राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे, अशी माहिती स्वत: गृहमंत्री देशमुख यांनी दिली. निवारी परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आरोप केल्यानंतरही अनिल देशमुख यांनी ही मागणी केलेली. अखेर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय झाला.

    मुख्यमंत्री महोदय, परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, दूध का दूध, पानी का पानी करावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते..., असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकार घेतला आहे आहे. या चौकशीसाठी राज्य सरकार चौकशी आयोग नेमणार आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here