कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 25, 2021

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!

 कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर!


मुंबई-
संपूर्ण देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला मोठ्या पातळीवर सुरुवात झाली. सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यात येत आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील लोकांना लस घेण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली. या कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

कोरोना लसीकरणातील टॉप 5 राज्य
राज्य               पहिला डोस दुसरा डोस एकूण डोस
महाराष्ट्र           43,42,646         6,72,128 50,14,774
राजस्थान         43,27,874         6,66,700 49,94,574
उत्तर प्रदेश       38,78,953         8,77,846 47,56,799
गुजरात           37,59,854         6,21,960 43,81,814
पश्चिम बंगाल   36,69,065         5,81,075 42,50,614

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी आणि लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र पहिलेच राज्य आहे, जिथे 50 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लस दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख 14 हजार 774 जणांचे लसीकरण पार पडले आहे. यापैकी 43 लाख 42 हजार 646 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 6 लाख 72 हजार 128 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशात 24 तासांत 23 लाख 3 हजार 305 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये 21 लाख 13 हजार 323 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 1 लाख 89 हजार 982 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत भारतात 5 कोटी 31 लाख 45 हजार 709 जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे. यामधील 4 कोटी 48 लाख 46 हजार 538 जणांनी पहिला डोस घेतला तर 82 लाख 99 हजार 171 जणांनी दुसरा डोस घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here