खर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

खर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान

 खर्डा ग्रामपंचायतीच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी

खर्डा ः खर्डा ग्रामपंचायत च्या वतीने खर्डा शहराच्या  विविध क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणार्‍या महिलांचा ट्रॉफी व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ.नमिता गोपाळघरे तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी कोकणी साहेब होते.
    महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी आहे त्या संधीचे सोने करून घेतले पाहिजे, आकाशात गवसणी घालण्यासाठी पंखात बळ निर्माण करण्याचे काम जागतिक महिला दिनी केले पाहिजे.स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी संस्कृती जपणारी तर घराचे घरपण आहे .
शेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रीयांनी उंच भरारी घेतली आहे .स्रियांच्या सन्मानाची सुरवात स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे.
    महिला सक्षमीकरण मोहीम कागदावर न रंगविता प्रत्येक्ष कृतीतून दिसली पाहिजे ,महिला दिन एक दिवसापूरता मर्यादित न ठेवता  वर्षभर महिलांचा सन्मान व आधार झाला पाहिजे   म्हणजेच  जागतिक महिला दिन साजरा झाला असा होईल असे विविध क्षेत्रातील प्रमुख महिलांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले
  यावेळी जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे, पंचायत समिती उपसभापती मनीषा सुरवसे,सरपंच नमिता गोपाळघरे, उपसरपंच रंजना लोखंडे,  ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गोलेकर,  संजीवनी पाटील, सुनीता  जावळे,कांचन शिंदे,दैवशाला  काळे,सीमा दराडे, शीतल भोसले, पूनम  खटावकर,इ उपस्थित होत्या.यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त डॉ,मनीषा राळेंभात, अंजली बिरंगळ ,शिक्षिका आशा गुरसाळी, स्वाती कुरमुडे,  प्राथमिक आरोग्य कर्मचारी हिराबाई गायकवाड, अंगणवाडी सेविका ज्योती गोलेकर,पुष्पा मोरे, रोहिणी गोपाळघरे,मीना वाघे,आशा स्वयंसेवीका  मंगल शिंगाने तर महिला व्यवसायिक म्हणून रेवती पाटील ,आश्विनी अनपट सह विविध क्षेत्रात काम करणार्‍या ग्रामपंचायत महिला कर्मचारी, बचत गट ,खेळाडू मुली,ज्या मुलीने अधिकारी पदावर झेप घेतले अशा सर्वांचे सन्मान करण्यात आले
   यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते,ग्रा प सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे,मदन गोलेकर, राजू मोरे, डॉ सोपान गोपाळघरे सह सर्व सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.
    अशा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात  सर्व क्षेत्रातील महिलांचा प्रथमच सन्मान झाल्यांने सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ग्रामपंचायत सदस्या सौ.संजीवनी पाटील  तर आभार उपसरपंच रंजना लोखंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment