महिलांनी शहरातील समस्यांबाबत एकत्र होत आवाज उठवावा : किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

महिलांनी शहरातील समस्यांबाबत एकत्र होत आवाज उठवावा : किरण काळे

 महिलांनी शहरातील समस्यांबाबत एकत्र होत आवाज उठवावा : किरण काळे

काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शहरामध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाईट यासारख्या मूलभूत नागरी समस्यांबाबत शहरातील महिला नागरिकांनी एकत्रित येत नागरिकांचा दबावगट निर्माण करत आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
    जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रीडा विभागाच्या पुढाकारातून महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी काळे बोलत होते.
यावेळी क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, उपाध्यक्ष प्रदीप पाटोळे, सचिव मच्छिंद्र साळुंखे, खजिनदार नारायण कराळे, सहसचिव मुकुंद नेवसे, चंद्रकांत वंजारी, प्राजक्ता नलावडे, अदील सय्यद, प्रसाद पाटोळे, मंदार सर, सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, सेवादल महिला अध्यक्ष कौसर खान, उषा भगत, सचिव नीता बर्वे, सुनीता बागडे, शेवगाव महिला अध्यक्ष कल्पना खंडागळे, डॉ.जहिदा शेख, सीमा बनकर, सुमन कालापहाड, शबाना शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना काळे म्हणाले की, भारतीय समाज आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील यशस्वीपणे काम करीत आहेत. क्रीडा अध्यक्ष प्रवीण गीते म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात युवतींनी नगर शहराला अनेक बक्षिसे मिळवून दिली आहेत. शहरामध्ये अनेक युवती, महिला क्रीडा शिक्षिका नवीन क्रीडापटूंना घडविण्याचे काम करीत आहेत. प्रसाद पाटोळे म्हणाले की, महिला क्रीडापटूंचा सन्मान करत असताना अधिकाधिक युवती खेळासाठी पुढे याव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. नलिनी गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्याची भूमिका पुढील काळात घेतली जाईल. यावेळी दिशा खिलवानी, सीमा लाड, अनुराधा माथेसुळ, सीमा साळुंखे, मनीषा म्हस्के, आशा कराळे, डायना बनकर, प्रांजल लाड आदींनी शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here