कर्जतमध्ये बँक कर्मचार्‍यांचा मूकमोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

कर्जतमध्ये बँक कर्मचार्‍यांचा मूकमोर्चा

 कर्जतमध्ये बँक कर्मचार्‍यांचा मूकमोर्चा


कर्जत :
बँक कर्मचार्‍यांच्या देशव्यापी संपाचे आज, मंगळवारी दुसर्‍या दिवशीही कर्जतमध्ये पडसाद उमटले. शहरामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचार्‍यांनी मूक मोर्चा काढला. आपल्या विविध मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन बँकेचे अधिकारी व कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. बँक कर्मचार्‍यांचे आंदोलन कर्मचार्‍यांच्या नोकरी अडचणीत येणार, या भीतीने नसून बँकांच्या खासगीकरणाचे दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेत सह छोटे व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी या सर्वांवर होणार आहेत.यामुळेच कर्मचार्‍यांच्या आंदोलनास सर्व जनतेने देखील दोन दिवस उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे, असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here