कर्जतसाठी 18 लाख 11 हजार रुपये तर जामखेडसाठी 27 लाख 2 हजारांचे अनुदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

कर्जतसाठी 18 लाख 11 हजार रुपये तर जामखेडसाठी 27 लाख 2 हजारांचे अनुदान

 कर्जतसाठी 18 लाख 11 हजार रुपये तर जामखेडसाठी 27 लाख 2 हजारांचे अनुदान

अतिवृष्टीचे उर्वरित अनुदान लवकरच होणार शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग..

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः डिसेंबर 2019-जानेवारी 2020 या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते.यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील काही गावांना या गारपिटीचा मोठा फटका बसला होता.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक होते.यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ.रोहित पवार यांनी नुकसानग्रस्त पिकांची अधिकार्‍यांसह बांधावर जाऊन पाहणी केली होती.तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि याबाबत पाठपुरावाही केला होता.आता कर्जत तालुक्यासाठी तिसर्‍या टप्प्यातील मदत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.  
   कर्जत तालुक्यातील 10 गावांतील 287 शेतकर्‍यांना 18 लाख 11 हजार रुपयांचे अनुदान तर जामखेड तालुक्यातील 19 गावातील 391 शेतकर्‍यांना 27 लक्ष 2 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असुन ही रक्कम  लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.शेतीपिकांचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.संयुक्त पंचनामे झाल्यानंतर 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती.यापुर्वी कर्जत तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात 12 कोटी 59 लक्ष एवढी रक्कम आली होती तर दुसर्‍या टप्प्यात 5 कोटी 10 लक्ष एवढी रक्कम आली होती.आता तिसर्‍या टप्प्यातील रक्कमही शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

No comments:

Post a Comment