युवक शेतकर्‍यांची नापिकीस व कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

युवक शेतकर्‍यांची नापिकीस व कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

 युवक शेतकर्‍यांची नापिकीस व कर्जास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड तालुक्यातील नान्नज येथील युवक शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर वय 47 याने आपल्या दोन गाय दगावल्या व कर्ज बाजारी व नापीकीस कंटाळुन आपल्या शेतातील रहात्या घरात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले आत्महत्या केली असल्याने संपूर्ण नान्नज गावात शोककळा पसरली असून शवविच्छेदनानंतर नान्नज येथील पांढरी मळा या ठिकाणी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आला आहे
   मयत युवक शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर वय 47 याने एक मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या पांढरीचा मळा या शेतातील रहात्या घरी विषारी औषधाचे प्राशन केले त्यास उलटी होऊ लागल्याने त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले घरच्यांनी मयत बाळु यांनी  औषध प्राशन केल्यानंतर शेजारील लोकांनी त्याला जामखेड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला मात्र दवाखान्यात पोहचण्यापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याने त्याच्या मृतदेहावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नान्नज येथील त्याच्या रहात्या घरी आणण्यात आला त्यानंतर मोठया शोकाकुल वातावरणात पांढरीचा मळा येथे त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपुर्ण गाव व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते मयत बाळु मोहळकर यांच्याकडे बॅक कर्ज तसेच शेतात नापीकीने परेशान त्यातच दुग्ध व्यवसायासाठी घेतलेल्या पशुधन दोन गाय तापाच्या आजाराने मृत्यू झाले आपले कुटुंब चालवयाचे कसे  सतत चिंतामय असत असे  याच वैफल्यातुन त्यांनी आत्महत्या केली असावी असे गावकरी व कुंटुबाच्या वतीने सांगण्यात आले त्यांच्या मागे वृध्द आई वय 70 पत्नी निता वय 34 मुलगा महेश वय 16 तर एक मुलगी निता वय 14 असा परिवार असुन बाळु मोहळकरच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपला आहे त्यामुळे शासनाच्या वतीने यांना त्वरीत मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या वतीने केली जात आहे.

No comments:

Post a Comment