आष्टी तालुक्यात गव्याची दहशत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

आष्टी तालुक्यात गव्याची दहशत

 आष्टी तालुक्यात गव्याची दहशत


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने शेतकर्‍यांनी शेतीतील पीक सोडून दिले होते. शेतकर्‍यांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झाली होती. ही भीती संपताच आता सुगीच्या दिवसांमध्ये कर्हेवडगाव  टकले वस्ती शेजारी शेतामध्ये शेतकर्‍यांना गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
   वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून या भागात विशेष लक्ष ठेवून आहेत. कर्‍हे वडगाव येथे शेतकरी राम नागरगोजे, अंबादास जालिंदर नगर्गोजे, विजय विधाते,हे शेतातून रविवार दि/ 28 फेब्रुवारी रात्री अकराच्या दरम्यान ज्वारी काढून परत येत असताना टकले वस्ती जवळील भागिनाथ टकले यांच्या शेतात आलेल्या कपाशीमध्ये अचानक मोठा प्राणी समोर दिसला प्रचंड घाबलेल्या परिस्थिती त्यांनी कधी न पाहिलेला प्राणी दिसल्याने गाडीवरून तिघे उतरून गाडीच्या उजेडाने मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असून हे व्हिडीओ वनविभागाला पाठविले असून घटनास्थळी वन विभागाचे पथक रवाना झाले आहे.
   या भागात विशेष लक्ष ठेवून आहे गव्याच्या पाहून खुणांची चाचणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाव याचा शोध घेण्याचे वन विभागाचे काम सुरू आहे या परिसरात प्रथम गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनरक्षक मातावळी के. काकडे वनरक्षक आष्टी डी .जे. चव्हाण चालक बीड दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

No comments:

Post a Comment