स्थानिक कर वसुलीसाठी मुख्यधिकार्‍याचे.. डफली बजाओ आंदोलन ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

स्थानिक कर वसुलीसाठी मुख्यधिकार्‍याचे.. डफली बजाओ आंदोलन !

 स्थानिक कर वसुलीसाठी मुख्यधिकार्‍याचे.. डफली बजाओ आंदोलन !

नागरिकांनी कर भरण्यास केली सुरवात

जामखेड :
नगरपरिषदेला कर्मचारी वेतन, पाणी पुरवठा योजना, पथदिवे इ. योजनांसाठी पैशाची गरज असते ही गरज नागरिकांच्या कररूपाने मिळणार्‍या पैशातून पूर्ण होत असते पण नागरिक गेल्या काही महिन्यापासून सवलत देऊनही कर भरीत नसल्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी डफली बजाव आंदोलन सुरु केले असून कर न भरणार्‍या नागरिकांच्या घरासमोर आज डफली बजाओ आंदोलन सुरु केले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांसमोर दंडवते यांनी डफली वाजवायला सुरुवात केली असून नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. व आता नागरिकांनी कार्यालयात जाऊन कर भरण्यास सुरुवात केली आहे.

   देशात आलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांना काही महिने येतील त्यापध्दतीने कर भरण्याची सवलत दिली होती. मात्र लॉकडाऊन नंतर व्यवहार सुरळीत झाल्यानंतरही करदाते कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाला कर्मचारी वेतन, पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्ती,दिवाबत्ती व्यवस्थेसह वेगवेगळ्या कामासाठी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते होते. कर्मचार्‍यांना तर वेतन मिळावे म्हणून अंदोलनही करावे लागेल होते. या सर्व पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने विविध पध्दतीने सुचना करूनही करदाते कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने नगर परिषदेने आज त्यांच्या घरापुढे डफली बजावो कार्यक्रम सुरू केला आहे. याबरोबरच नागरिकांना कारवाईची वाट न पाहता टॅक्स भरावा असेही आवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment