नगरमध्ये दरोडा; सोने विक्री बीडला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

नगरमध्ये दरोडा; सोने विक्री बीडला!

 नगरमध्ये दरोडा; सोने विक्री बीडला!

दिवसा व रात्रीही घरफोडी केल्याची कबुली. 24 तोळे सोने 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भर दिवसा दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल लूटणार्‍या दोघांना जेरबंद करण्यात आलंय. अहमदनगरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून आतापर्यंत दोघांना बीड जिल्ह्यातील शिरुरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. भगवान भोसले आणि रामा इंगळे असे दोन्ही आरोपींची नावं आहेत. दरोडे टाकल्याचे भगवान भोसले याने कबूल केले आहे.
    आरोपी भगवान भोसले व त्याच्या साथीदारांनी नगर तालुका, एमआयडिसी, पारनेर हद्दीत चोर्‍या केल्याचे निष्पन्न झाल्या आहेत. आरोपी भगवान भोसले याच्याविरुद्ध कर्जत, आष्टी (जि. बीड), सांगोला (जि. सोलापूर), कर्जत, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या तपासादरम्यान 5 घरफोडी चोर्‍या, 1 जबरी चोरी असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन वाहने व दोन मोबाईल असा एकूण 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलिस ठाण्यात पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, चोरीचे प्रकार वाढले होते.लुटीच्या वाढत्या प्रकरणांमुळे जिल्ह्यातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे अहमदनगरचे पोलीस मागील कित्येक दिवसांपासून चोरांच्या शोधात होते. या पार्श्वभूमीवर त्यानंतर भागवान भोसले याने दरोडा टाकून नुकतंच तब्बल 25 तोळे सोने पळवल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली. त्यांनतर सापळा रचत पोलिसांनी आरोपी भगवान भोसले याला बीडमधून अटक केले. यावेळी त्याच्याकडे तब्बल 25 तोळे सोने सापडले. तसेच त्याच्याकडून 14 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
   दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरु केली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. आरोपी भगवान भोसले हा आपल्या साथीदारांसह अहमदनगर जिल्ह्यात भर दिवसा तसेच रात्रीसुद्धा घरफोडी करायचा. चोरी केलेला माल तो बीड  जिल्ह्यातील रामा इंगळे या व्यक्तीला विकायचा. यावेळी भोसले याने अहमदनगर जिल्ह्यातून सोन्याची चोरी करून ते विकण्यासाठी बीड गाठल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजली होती. त्यानंतर कटके यांच्या नेतृत्वात पोलिसांनी भगवान भोसलेसह रामा इंगळे यालासुद्धा अटक केली.
   दरम्यान, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. आरोपी भगवान भोसले याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
   जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई गणेश इंगळे, पोना सुनील चव्हाण, पोहेकाँ दत्तात्रेय हिंगडे, बबन मखरे, अण्णा पवार, संदीप दरंदले, शंकर चौधरी, दीपक शिंदे, जालिंदर माने, चापोहेकाँ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment